शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

West Bengal Election Result 2021 Highlights: पश्चिम बंगालमध्ये भाजपाची जोरदार मुसंडी; ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 09:32 IST

West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यापैकी हाय व्होल्टेज निवडणूक समजल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी टेन्शनमध्ये आल्या आहेत.

देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यापैकी हाय व्होल्टेज निवडणूक समजल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Election Result Highlight) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी टेन्शनमध्ये (Mamata Banerjee ) आल्या आहेत. भाजपाने कडवी टक्कर दिली असून सुरुवातीच्या कलांमध्ये एक आणि दोन आकड्यांच्या फरकाने तृणमूल पुढे असल्याचे दिसत आहे. (West Bengal Election Result 2021 Highlight : - Mamata Banerjee trailing in Nandigram in postal vote counting.)

पश्चिम बंगालमध्ये 96 जागांवर सुरुवातीच्या कलामध्ये तृणमूल काँग्रेस 49 आणि भाजपा 47 जागांवर पुढे दिसत आहे. तामिळनाडूमध्ये डीएमके 10, तर एडीएएमके 1 जागेवर पुढे आहे. तर आसाममध्ये भाजपा 5, काँग्रेस 3 जागांवर पुढे दिसत आहे.  केरळमध्ये एलडीएफ 31 काँग्रेस 27 भाजपा 3 जागांवर पुढे दिसत आहे. 

धक्कादायक म्हणजे सुरुवातीला पोस्टल मतदान मोजणी करण्यात आली. यामध्ये भाजपाने जोरदार टक्कर दिली आहे. तसेच महत्वाची बाब म्हणजे नंदीग्राममध्ये भाजप नेते शुभेंदू अधिकारी आघाडीवर; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत. 

या वेळी बंगालमध्ये टीएमसी प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक प्रचारात 44 दिवस व्हीलचेअरवर प्रचार करत होत्या. पंतप्रधान मोदींनी बंगालमध्ये सुमारे 20 जाहीर सभा घेतल्या आणि अमित शहा यांनी सुमारे 70 रॅली काढल्या. टीएमसी उमेदवाराच्या समर्थनार्थ ममता बॅनर्जी यांनी सुमारे 150 जाहीर सभांना संबोधित केले.ममता बॅनर्जी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी केंद्राला जबाबदार धरताना दिसल्या. म्हणून त्यांनी असेही आश्वासन दिले की टीएमसी सरकार आल्यास बंगालच्या लोकांना विनामूल्य लसीकरण केले जाईल. राहुल-ममता नंतर पंतप्रधान मोदींनीही सर्व सभा रद्द केल्या आणि भाजपने सभेसाठी फक्त 500 लोकांची संख्या मर्यादित केली

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसAssembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021