शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

TMC आमदारानं लेफ्ट-काँग्रेसला सोबत येण्याचं केलं आवाहन; भाजप म्हणालं, "बदलांसाठी बंगाल..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 18:22 IST

west bengal election 2021 : तृणमूल काँग्रेसच्या आमदारानं सभेदरम्यान केलं डावे पक्ष आणि काँग्रेसला सोबत येण्याचं आवाहन

ठळक मुद्देतृणमूल काँग्रेसच्या आमदारानं सभेदरम्यान केलं डावे पक्ष आणि काँग्रेसला सोबत येण्याचं आवाहनआम्ही बदलांसाठी तयार, भाजपची प्रतिक्रिया

येत्या काही महिन्यांमध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप आपलं वर्चस्व निर्माण करू पाहत आहे. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसही आपली सत्ता कायम राखण्याच्या प्रयत्नात आहे. अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या एका आमदारानं भाजपचा सामना करण्यासाठी लेफ्ट आणि काँग्रेसला आपल्या सोबत येऊन निवडणूक लढवण्याचं आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे भाजपनंदेखील तृणमूलवर निशाणा साधला आहे.जर खरंच डावे पक्ष आणि काँग्रेस भाजपविरोधी आहे तर त्यांनी भगव्या पक्षाच्या सांप्रदायिक आणि विभाजन करणाऱ्या राजकारणाविरोधात ममता बॅनर्जींच्या लढाईत सहकार्य करायला हवं, असं तृणमूल काँग्रेसचे नेते तापस रॉय यांनी पश्चिम बंगालमधील बांकुरामध्ये आयोजित एका जनसभेला संबोधित करताना म्हटलं. "ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचा विरोध करून बंगालमध्ये अधिक धोकादायक अशा भाजपला आमंत्रित करण्याची चूक करू नये. त्रिपुरामधील स्थिती त्यांनी पाहिली पाहिजे आणि काय केलं पाहिजे हे ठरवावं," असं तापस रॉय म्हणाले. यापूर्वीदेखील तृणमूल काँग्रेसनं डावे पक्ष आणि काँग्रेसला एकत्र येण्याचं आवाहन काही नेत्यांनी केलं होतं. भाजपकडून हल्लाबोल"भाजपसोबत तृणमूल काँग्रेस एकट्यानं लढू शकत नाही याची कल्पना त्यांना आली आहे. त्यांना (काँग्रेस, डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेस) यांनी एकत्र लढलं पाहिजे. आम्ही बंगालमध्ये लढण्यास आणि बदल घडवण्यास तयार आहोत," अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगालमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी दिली. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकBJPभाजपाtmcठाणे महापालिका