"तुम्हालाही मोदींचीच कोरोना लस घ्यावी लागेल; त्यांच्या विरोधात बोलणं म्हणजे लोकशाहीच्या विरोधात बोलणं"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 06:21 PM2021-03-19T18:21:00+5:302021-03-19T18:23:04+5:30

West Bengal Election 2021: आम्हाला मोदींचं तोंडही पाहायचं नसल्याचं यापूर्वी म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जी

west bengal election 2021 bjp leader suvendu adhikari slams cm mamata banerjee over corona vaccine democracy | "तुम्हालाही मोदींचीच कोरोना लस घ्यावी लागेल; त्यांच्या विरोधात बोलणं म्हणजे लोकशाहीच्या विरोधात बोलणं"

"तुम्हालाही मोदींचीच कोरोना लस घ्यावी लागेल; त्यांच्या विरोधात बोलणं म्हणजे लोकशाहीच्या विरोधात बोलणं"

Next
ठळक मुद्देआम्हाला मोदींचं तोंडही पाहायचं नसल्याचं यापूर्वी म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जीभाजप नेत्यानंही साधला ममता बॅनर्जींवर निशाणा

आता लवकरच पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडणार आहे. सध्या भाजप आणि तृणमूल काँग्रेसकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. एकीकडे तृणमूल काँग्रेसकडून पंतप्रधाननरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य करण्यात येत आहे. भाजपकडून ममता बॅनर्जींवर निशाणा साधला जात आहे. यापूर्वी पूर्व मदिनापूर येथे झालेल्या रॅलीत ममता बॅनर्जींनी आक्रमक होत आपल्याला नरेंद्र मोदींचं तोंडही पाहायचं नसल्याचं वक्तव्य केलं होतं. यानंतर तृणमूल काँग्रेसमधूनच भाजपत सामील झालेल्या एका नेत्यानं ममता बॅनर्जींवर निशाणा साधत मोदींविरोधात बोलणं म्हणजे लोकशाही विरोधात बोलणं असल्याचं म्हटलं. 

"तुम्हाला पंतप्रधान मोदींचीच कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी लागणार आहे. ते निवडून आलेले पंतप्रधान आहेत. त्यांच्या विरोधात बोलणं म्हणजे लोकशाहीच्या विरोधात बोलणं. त्यांच्याविरोधात बोलणं म्हणजे भारत मातेच्या विरोधात बोलणं. पाकिस्तान आणि बांगलादेशकडे लस नाही, त्यामुळे तुम्हाला मोदींचीच लस घ्यावी लागेल," असं म्हणत सुवेंदु अधिकारी यांनी जोरदार निशाणा साधला.



काय म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जी?

काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जींच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांनी पायाला प्लॅस्टर असल्यामुळे व्हिलचेअरवरून प्रचार करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी पूर्व मदिनापूर येखे शुक्रवारी एका रॅलीला संबोधित केलं. "भाजपला निरोप द्या. आपल्याला भाजप नकोय. आम्हाला मोदींचा चेहराही पाहायचा नाही. आपल्याला हिंसाचार, लुटारू, दुर्योधन, दुशासन, मीर जाफर नकोयत," असं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. 

Web Title: west bengal election 2021 bjp leader suvendu adhikari slams cm mamata banerjee over corona vaccine democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.