शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

ममता दिदींच्या समर्थनासाठी शरद पवार मैदानात, म्हणाले, एका महिलेला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 16:53 IST

West Bengal Assembly Elections 2021, Sharad Pawar Support Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांना बंगालच्या सत्तेतून बाहेर काढण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील विविध नेते ममता बॅनर्जी यांच्या समर्थनासाठीही पुढे येत आहेत.

ठळक मुद्देएक महिला जी गेल्या दहा वर्षांपासून बंगालच्या सत्तेवर आहे. तिच्याविरोधात पंतप्रधान, गृहमंत्री आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उभे आहेत ममतांना सत्तेवरून हटवण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण ताकद झोकून दिली आहेकेंद्रातील भाजपा सरकार गैर भाजपाशासित राज्यांमध्ये केंद्रीय संस्था सीबीआय, ईडी यांच्या माध्यमातून त्रास देण्याचे प्रयत्न करत आहे

रांची - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी (West Bengal Assembly Elections 2021) अटीतटीचा प्रचार सुरू झाला आहे. गेल्या १० वर्षांपासून राज्यात सत्तेवर असलेल्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस आणि राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये मुख्य लढत होत आहे. ममता बॅनर्जी यांना बंगालच्या सत्तेतून बाहेर काढण्यासाठी भाजपाने (BJP) कंबर कसली आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील विविध नेते ममता बॅनर्जी यांच्या समर्थनासाठीही पुढे येत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनीही ममता बॅनर्जींना पाठिंबा देत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.  (Sharad Pawar in support of West Bengal  Chief Minister Mamata Banerjee)रांचीमध्ये रविवारी झालेल्या पक्षाच्या संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली. त्यावेळी ते म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकार गैर भाजपाशासित राज्यांमध्ये केंद्रीय संस्था सीबीआय, ईडी यांच्या माध्यमातून त्रास देण्याचे प्रयत्न करत आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीदरम्यानही मोठ्या प्रमाणात तपास यंत्रणांचा वापर होत आहे. ममता बॅनर्जींच्या बाजूने भक्कमपणे उभे राहताना शरद पवार म्हणाले की, एक महिला जी गेल्या दहा वर्षांपासून बंगालच्या सत्तेवर आहे. तिच्याविरोधात पंतप्रधान, गृहमंत्री आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उभे आहेत. ममतांना सत्तेवरून हटवण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण ताकद झोकून दिली आहे. दुसरीकडे शेतकरी आंदोलनाचे शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे त्यांना भेटण्यासाठी वेळ नाही आहे. देश-जग फिरणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना भेटण्यासाठी २० किलोमीटर प्रवास करू शकत नाही आहेत, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. पश्चिम बंगालसोबत केरळ, तामिळनाडू आणि आसाममध्ये अन्य राजकीय पक्षांविरोधात केंद्रीय सत्तेतील अधिकारांचा गैरवापर केला जात आहे. शरद पवार यांनी सांगितले की, केंद्र सरकार सद्यस्थितीमध्ये केवळ एकच काम करत आहे. जिथे भाजपाची सत्ता नाही तिथे सीबीआय आणि ईडीच्या मदतीने त्रास देण्याचे प्रयत्न केले जात आहेत, अशी टीकाही शरद पवार यांनी केली.    

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Sharad Pawarशरद पवारMamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा