म्हणून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी शिवसेनेचे मानले खास आभार, केला विशेष उल्लेख...

By बाळकृष्ण परब | Published: March 5, 2021 03:37 PM2021-03-05T15:37:22+5:302021-03-05T15:38:33+5:30

West Bengal assembly election 2021 : पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने आज आपल्या २९१ उमेदवारांची यादी घोषित केली आहे.

west bengal assembly election 2021 : Chief Minister of West Bengal Mamata Banerjee thanked to Shiv Sena and made a special mention ... | म्हणून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी शिवसेनेचे मानले खास आभार, केला विशेष उल्लेख...

म्हणून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी शिवसेनेचे मानले खास आभार, केला विशेष उल्लेख...

Next

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने आज आपल्या २९१ उमेदवारांची यादी घोषित केली आहे. (West Bengal assembly election 2021) तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) उपस्थित होत्या. त्यांनी नंदिग्राम मतदारसंघामधून आपली उमेदवारी जाहीर केली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या देशातील विविध प्रादेशिक पक्षांचे आभार मानले. त्यात त्यांनी शिवसेनेचा विशेष उल्लेख केला. (Chief Minister of West Bengal Mamata Banerjee thanked to Shiv Sena and made a special mention ...)

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देणारे तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन आणि शिवसेनेचे मी आभार मानते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने तृणमूल काँग्रेससमोर कडवे आव्हान उभे केले आहे. त्या पार्श्वभूमीवर काल शिवसेनेने पश्चिम बंगालमध्ये उमेदवार उभे न करण्याची घोषणा करत तृणमूल काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला होता.

दरम्यान, आज प्रसारमाध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपाला जोरदार प्रत्युत्तर देण्याचीही घोषणा केली. तृणमूल काँग्रेसविरोधात बंडखोरी करत भाजपात दाखल झालेल्या आणि या निवडणुकीत नंदिग्राम आणि आसपासच्या भागात तृणमूलसाठी डोकेदुखी ठरू शकणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांना थेट आव्हान देण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत नंदिग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा मतदारसंघ सुवेंदू अधिकारी यांचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने आता येथे ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदू अधिकारी यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. 

शिवसेनेने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींना पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. 'सध्याची परिस्थिती पाहता दीदी विरुद्ध सगळे असा सामना आहे. सगळे एम, म्हणजेच मनी, मसल आणि मीडिया एकट्या ममतांविरोधात वापरले जात आहेत. त्यामुळे बंगालमध्ये निवडणूक न लढवण्याचा आणि ममता दीदींसोबत ठामपणे उभं राहण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. ममता दीदींना उत्तम यश लाभो. कारण त्या बंगालच्या खऱ्या वाघीण आहेत,' असं राऊत यांनी या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

Read in English

Web Title: west bengal assembly election 2021 : Chief Minister of West Bengal Mamata Banerjee thanked to Shiv Sena and made a special mention ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.