शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

West Bengale Assemble Election: ऑडिओ वादळ: भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय आणि घोष यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 06:20 IST

राजकारण ढवळून निघाले : सरकार आणि भाजपने खुलासा करावा - काँग्रेसची मागणी

शीलेश शर्मा नवी दिल्ली : भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांचे नाव कथितरीत्या समाविष्ट असलेली एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, यामुळे प. बंगालमध्ये ऐन निवडणुकीत खळबळ माजली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये संतोष नावाची व्यक्ती स्वत:साठी भाजपची उमेदवारी मागण्यासाठी पैशांच्या देवाण-घेवाणीची चर्चा करत आहे. यात मुलींची मागणी, लैंगिक छळाचाही उल्लेख आहे. 

कैलाश विजयवर्गीय व भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्याशी तिकिटाबाबत चर्चा करणारा संतोष यांना सांगत आहे की, दोन्ही नेते शौकीन आहेत. दिलीप घोष यांना शिवीगाळ करताना हा कथित नेता संतोष यांना म्हणत आहे की, दिलीप घोष आमच्या शब्दाबाहेर नाहीत. ते विश्वास देतात की, जीतूभाईने तिकीट देण्याचे काम सुरू केले आहे. तिकीट नाही मिळाले तर तुमचे पैसे परत. सोशल मीडियावर ही ऑडिओ क्लिप प. बंगालमधील वरिष्ठ पत्रकार सीमा सेन गुप्ता यांनी व्हायरल केली आहे. सरकार आणि भाजपने याबाबत खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. 

पक्षाच्या संसद सदस्य अमी याग्निक आणि प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटले आहे की, लैंगिक छळाचा हा मुद्दा गंभीर आहे. याची चौकशी व्हायला हवी. काँग्रेसने ती ऑडिओ क्लिपही जारी केली आहे, ज्यात कथित आरोप लावण्यात आले आहेत. 

भाजपचे बळ वाढणार, सत्ता नाही- प्रशांत किशोर कोलकाता : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या निकालाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच थेट लढाई आहे. निकालानंतर भाजपला सत्ता मिळणार नाही हे निश्चित आहे. मात्र राज्यात भाजपचे बळ वाढेल, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

बंगालमधील सद्यस्थितीत जी राजकीय परिस्थिती आहे ते पाहता ममता बॅनर्जी याच मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. मात्र भाजपच्या निकालांची देखील दखल घ्यावीच लागेल. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा प्रवेश झाला असून त्यांचा पराजय झाला तरी ते एक मजबूत पक्ष म्हणून समोर येतील, असे भाकीत प्रशांत किशोर यांनी वर्तविले आहे. 

भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार गुलदस्त्यातविधानसभा निवडणुकांचा प्रचार रंगात आला असताना भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील प्रचारसभेदरम्यान नाव गुलदस्त्यातच ठेवले. भाजपची सत्ता आली तर बाहेरील नव्हे, तर स्थानिक नेताच मुख्यमंत्री होईल, असे त्यांनी प्रतिपादन केले. 

तृणमूल काँग्रेसकडून बंगालला आपली मुलगी हवी अशी मोहीम सुरू करण्यात आली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना व प्रचाराला येणाऱ्या नेत्यांना निवडणुकीचे पर्यटक असे संबोधण्यात येत आहे. बंगालने संपूर्ण भारताला वंदे मातरम् च्या भावनेत बांधले आहे. मात्र, त्याच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उमेदवारांना बोहिरागोतो म्हणजे बाहेरचा असल्याचा दावा करत आहेत. 

टॅग्स :BJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१