शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal Election : बरमुडा परिधान करण्याच्या वक्तव्यावर दिलीप घोष यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, "महिलांनी... "

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 17:43 IST

West Bengal Election 2021 : एका सभेदरम्यान, ममता बॅनर्जींबाबत दिलीप घोष यांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

ठळक मुद्देएका सभेदरम्यान, ममता बॅनर्जींबाबत दिलीप घोष यांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्यटीकेनंतर दिलीप घोष यांनी दिलं स्पष्टीकरण

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचा (west bengal assembly election 2021) पहिला टप्पा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, प्रचाराला वेग आला आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप (BJP) एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र, आता एकमेकांवर आरोप करताना नेते मंडळी वादग्रस्त विधाने करायला लागल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्रीममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली. ममता बॅनर्जी यांनी साडी नाही, तर बरमुडा घालावा, असे विधान भाजप नेत्यानं केलं होतं. त्यानंतर अनेक स्तरातून त्यांच्यावर टीका झाली होती. दरम्यान यानंतर दिलीप घोष यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. (west bengal assembly election 2021 bjp leader dilip ghosh made disputed statement on mamata banerjee)"त्या (ममता बॅनर्जी) आमच्या मुख्यमंत्री आहेत. त्या बंगालच्या संस्कृतीप्रमाणेच योग्य काम करतील अशी आम्ही अपेक्षा करतो. महिलांनी साडी परिधान करून पाय दाखवणं अयोग्य आहे. लोकं त्यावर आक्षेप घेत आहेत. मला ते आक्षेपार्ह वाटलं म्हणून मी त्यावर बोललो," असं स्पष्टीकरण दिलीप घोष यांनी दिलं. काय म्हणाले होते घोष?"प्लास्टर कापलेले आहे. क्रॅप बँडेज बांधलेले आणि पाय वर करून सर्वांना दाखवत आहेत. साडी परिधान केलेली आहे. एका पाय उघडा आणि एक पाय झाकलेला आहे. अशा प्रकारची साडी नेसलेलं कधीच कुणाला पाहिलेलं नाही. तर मग बरमुडा का परिधान केला नाही, असं धक्कादायक विधान दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जींवर टीका करताना केलं होतं.या माकडांना वाटते ते बंगाल जिंकतील?टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ट्वीट करून दिलीप घोष यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला होता. भाजपच्या पश्चिम बंगालच्या अध्यक्षांनी सार्वजनिक सभेत आपला पाय दाखवण्यासाठी बरमुडा शॉर्ट परिधान केला पाहिजे, असं घोष यांनी म्हटलं आहे आणि या माकडांना वाटतं आहे की, ते बंगालमध्ये जिंकतील? अशी विचारणा महुआ मोईत्रा यांनी केली. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१All India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जीChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपा