शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीची ऑटो लवकरच पंक्चर करू; चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 12:10 IST

बावनुकळे हे ‘युवा वॉरियर्स’ अभियानांतर्गत अमरावतीत गुरुवारी आले असता, पत्रपरिषदेत बोलत होते. १८ ते २५ वयोगटातील युवक, युवतींना देशाच्या जडणघडणीत सहभागी करून घेण्यासाठी हा उपक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाविकास आघाडीला सत्तेचा माज आला असून, ही तीनचाकी ऑटो लवकरच पंक्चर केलीजाईल, असा इशारा राज्याचे माजी ऊर्जामंत्री तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

बावनुकळे हे ‘युवा वॉरियर्स’ अभियानांतर्गत अमरावतीत गुरुवारी आले असता, पत्रपरिषदेत बोलत होते. १८ ते २५ वयोगटातील युवक, युवतींना देशाच्या जडणघडणीत सहभागी करून घेण्यासाठी हा उपक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

राज्यातील जनता महाविकास आघाडीच्या गलथान कारभारामुळे त्रस्त आहे. येत्या जिल्हा परिषद, महापालिका, नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजप जनतेपर्यंत पाेहोचून महाविकास आघाडीने भकास कसे केले, याची माहिती देणार असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बेकायदेशीरपणे अटक केली, हे न्याय दंडाधिकाऱ्यांनी जामीन देऊन सिद्ध केले आहे. शिवसेनेला सत्तेचा माज आला आहे. येत्या निवडणुकांमध्ये सेनेला जागा ठेवणार नाही, असे भाजपचे नियोजन आहे. अमरावती शहरात शिवसेनेने धुडघूस घातला असून, गुंड सैनिकांना अटक व्हावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे. 

भाजप-युवा स्वाभिमान एकत्र नाहीभाजप आणि युवा स्वाभिमान एकत्र निवडणूक लढणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. आमदार रवि राणा हे भाजपचे सहयाेगी सदस्य आहेत. त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषद अथवा नगर परिषद निवडणुका भाजप आणि युवा स्वाभिमान एकत्र लढणार, ही केवळ चर्चा असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाShiv Senaशिवसेना