शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेत संभ्रम?; संजय राऊत म्हणतात, 'ती' पक्षाची अधिकृत भूमिका नाही

By कुणाल गवाणकर | Updated: November 19, 2020 18:13 IST

कराची स्वीट्सचं नाव बदलण्याच्या मागणीवर संजय राऊत यांचं स्पष्टीकरण

मुंबई: शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी कराची स्वीट्सचं नाव बदलण्याची मागणी केली. यावर भाष्य करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. कराची स्वीट्सचं नाव बदलण्याची मागणी निरर्थक असल्याचं म्हणत ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं राऊत म्हणाले. त्यामुळे या विषयावर शिवसेनेत संभ्रम आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.शिवसेना नेते नितीन नांदगावकर कराची स्वीट्समध्ये जाऊन दुकानाचं नाव बदलण्याची मागणी केली. 'मला कराची शब्दाचा तिरस्कार वाटतो. कारण ते पाकिस्तानातलं शहर आहे. मी तुम्हाला काही वेळ देतो. तुम्ही दुकानाचं नाव बदला,' असं नांदगावकर यांनी दुकानाच्या मालकांना सांगितलं. त्यावर आमचे पूर्वज पाकिस्तानात आले होते, असं उत्तर मालकांनी दिलं. यानंतर नांदगावकरांनी तुमचं इथं स्वागतच आहे. पण तुम्हाला दुकानाचं नाव बदलावं लागेल. तुम्ही हवं तर तुमच्या पूर्वजांचं नाव दुकानाला द्या, असं मालकांना सांगितलं.भाजपसोबत युती करणार का?; राज ठाकरेंच्या विश्वासू शिलेदारांचं 'मनसे' उत्तरया प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. 'कराची बेकरी आणि कराची स्वीटस 60 वर्षापासून मुंबईसह देशात आहेत. त्यांचा पाकिस्तानशी सबंध नाही. निर्वासित सिंधी पंजाबी बांधवांनी कष्टातून ऊभा केलेला हा व्यवसाय आहे. कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे. ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही,' असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

कराची स्वीटविरोधात मनसे आक्रमकमुंबईत 'कराची स्विट्स' नावाने मिठाईचे दुकान चालवणाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दणका दिला आहे. या आस्थापनांच्या मालकांना मनसे थेट कोर्टात खेचणार आहे. मनसेचे उपाध्यक्ष हाजी सैफ शेख यांनी 'कराची स्विट्स'च्या व्यवस्थापकांना नोटीस पाठवली आहे. 

मराठी पाट्या आणि पाकिस्तानी कलाकारांविरोधात आंदोलन करण्याऱ्या मनसेने मुंबईत 'कराची स्विट्स' नावाने दुकान सुरू असल्याचं निदर्शनास येताच आक्रमक पवित्रा घेतला. पाकिस्तानची राजधानी असलेल्या कराची शहराच्या नावाने मुंबईत दुकान चालवण्यास मनसेने आक्षेप घेतला आहे. याबाबतच पत्र देखील हाजी सैफ शेख यांनी दुकानाच्या व्यवस्थापकांना पाठवलं आहे. मुंबई महापालिकेत भाजपा-मनसे युती होणार?; प्रविण दरेकरांच्या विधानानं उत्सुकता लागली'देशाचा पारंपारिक शत्रू देशाची राजधानी 'कराची' या नावाचा आधार घेत मुंबईत 'कराची स्विट्स' नावाची दुकानं सुरू करुन भारतीयांच्या राष्ट्रवादाला ठेच पोहोचवून व्यवसाय केला जात आहे. तसेच मराठी भाषेचा द्वेष केला जात आहे', असं मनसेचे नेते हाजी सैफ यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. 

हाजी सैफ यांनी याबाबत कराची स्विट्सच्या व्यवस्थापकांना कोर्टात खेचणार असल्याचंही म्हटलं आहे. दुकानावरील नाव तात्काळ हटविण्याची मागणी करत एक कायदेशीर नोटीससुद्धा हैदराबाद येथील कराची स्विट्सच्या व्यवस्थापकांना स्पीडपोस्टने पाठविण्यात आली आहे.   

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMNSमनसेShiv Senaशिवसेना