भाजपसोबत युती करणार का?; राज ठाकरेंच्या विश्वासू शिलेदाराचं 'मनसे' उत्तर

By कुणाल गवाणकर | Published: November 19, 2020 05:17 PM2020-11-19T17:17:37+5:302020-11-19T18:22:09+5:30

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या मनसे सोबतच्या युतीबद्दलच्या विधानावर नांदगावकरांचं उत्तर

mns leader bala nandgaonkar reaction on alliance with bjp in mumbai municipal corporation election | भाजपसोबत युती करणार का?; राज ठाकरेंच्या विश्वासू शिलेदाराचं 'मनसे' उत्तर

भाजपसोबत युती करणार का?; राज ठाकरेंच्या विश्वासू शिलेदाराचं 'मनसे' उत्तर

Next

मुंबई: भारतीय जनता पक्षानं मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. २०२२ मध्ये मुंबई महापालिकेवर भाजपचाच भगवा फडकेल, अशी गर्जना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर शिवसेनेनंदेखील फडणवीस यांना आव्हान दिलं. त्यामुळे मुंबईत राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या युतीबद्दल करण्यात आलेल्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरानं नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

'कराची स्विट्स'ला मनसेचा दणका, थेट कोर्टात खेचणार!

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती होणार का, असा प्रश्न दरेकर यांना विचारण्यात आला. त्यावर आजतरी भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. पण निवडणुकीच्या वेळी निर्णय घेऊ असं सांगत त्यांनी आगामी काळात मनसे-भाजप युती होईल का? याची उत्सुकता कायम ठेवली आहे. 

मुंबई महापालिकेत भाजपा-मनसे युती होणार?; प्रविण दरेकरांच्या विधानानं उत्सुकता लागली

प्रविण दरेकर यांच्या प्रतिक्रियेनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना भाजपसोबत युती करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. 'त्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे याबद्दल विचार करतील. राज साहेबांनी विचार करायला प्रविण दरेकर आता फारच मोठा झाला आहे,' असा टोला नांदगावकर यांनी लगावला. दरेकर आधी मनसेत होते. मनसेकडूनच ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर २०१४ मध्ये मागाठाणे मतदारसंघात पराभव झाल्यानंतर त्यांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला.

सोमवारपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा...; वाढीव वीज बिलांवरून मनसेचा ठाकरे सरकारला इशारा

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून रणनीती आखण्यासाठी बैठक आयोजित केली होती, या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आगामी महापालिकेत भाजपाचा भगवा झेंडा फडकेल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला होता.

काय म्हणाले संजय राऊत?
देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांसमोर अशी विधाने करु शकतात, भाजपाला वाटत असेल आता जो छत्रपतींचा भगवा फडकत आहे तो शुद्ध नाही आणि ते जे कोणता भगवा फडकवणार असेल तो शुद्ध आहे याचा निर्णय जनता ठरवेल, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी राज्यात १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे. जेव्हा जेव्हा दिल्लीकडून मुंबईची कुंचबणा झाली आहे तेव्हा तेव्हा मराठी माणूस रस्त्यावर उतरला आहे, त्यात शिवसैनिक आघाडीवर आहे. हा इतिहास भाजपाने चाळला पाहिजे, या लोकांना मुंबई महाराष्ट्रात ठेवायची नाही. मुंबईत येणाऱ्या उद्योगपतींना हुसकावून त्यांच्या राज्यात नेतात, मुंबईचं महत्त्व कमी करतायेत त्यावर भाजपा नेते बोलत नाही, मुंबई ओरबडायची असेल तर त्याला आमचा विरोध आहे, १०० पिढ्या आल्या तरी मुंबई महापालिकेवर भगवा उतरवायचं सोडा पण हात लावण्याचीही हिंमत नाही नाही, कारण या भगव्यात आग आहे असं संजय राऊत म्हणाले होते.

Web Title: mns leader bala nandgaonkar reaction on alliance with bjp in mumbai municipal corporation election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.