शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

चौकीदार शतप्रतिशत चोर; राहुल गांधी यांचे कर्नाटकात टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 03:46 IST

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौकीदार हा शतप्रतिशत चोरच असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केली.

कोलार : भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौकीदार हा शतप्रतिशत चोरच असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केली. मोदी यांनी ३0 हजार कोटी रुपये चोरुन त्यांचे मित्र अनिल अंबानी यांना दिल्याचा राफेल विमानाच्या सौद्यावरून त्यांनी आरोप केला.कर्नाटकातील कोलार येथील एका रॅलीमध्ये राहुल यांनी मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, भ्रष्टाचाऱ्यांच्या सर्वच नावांमध्ये मोदी कसे असा प्रश्न करून राहुल यांनी नीरव असो, ललित असो वा नरेंद्र सारेच मोदी भ्रष्टाचारी निघाले, अजून असे किती मोदी पुढे येतील ते, समजत नाहीत, अशी टीका केली.नीरव, ललित, मेहुल चोकसी, मल्ल्या, अनिल अंबानी यांच्यासोबत नरेंद्र मोदीसह साºयाच चोरांची एक टोळी आहे. स्वत:ला चौकीदार समजणारे मोदी आता शेतकरी, रोजगार आणि भ्रष्टाचाराबद्दल बोलतच नाहीत.तुम्ही कधी शेतकºयाच्या, कामगाराच्या आणि बेरोजगार व्यक्तीच्या घराबाहेर चौकीदार पाहिला आहे का? पण हे चौकीदार मात्र १५-२० धनदांडग्यांची चौकीदारी करता आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है, अशी मोहीम यापूर्वीच सुरू केली होती. गेल्या वर्षी नोव्हेबंर महिन्यात राजस्थानात झालेल्या रॅलीत राहुल यांनी चौकीदार चोर है, अशी देशाची नवी मोहीम असेल, असे म्हटले होते. मोदीजी म्हणाले होते, मला एकवेळ पंतप्रधान बनवू नका, पण देशाचा चौकीदार करा, परंतु सत्तेत येताच पंतप्रधानांनी त्यांचे शब्द फिरविले आणि लोकांचा विश्वास गमावला, अशी टीकाही त्यांनी केली.
काँग्रेस जर सत्तेत आली, तर संसदेत आणि विधानसभेबरोबरच सरकारी नोकरीतही महिलांना ३३ टक्के आरक्षण देईल, अशी घोषणा यावेळी राहुल यांनी केली. राहुल गांधी यांनी या रॅलीत न्याय योजनेचाही उल्लेख केला. ते म्हणाले, या योजनेंतर्गत जवळपास पाच कोटी परिवारांच्या खात्यात वार्षिक ७२ हजार रुपयांची रक्कम देण्यात येईल. पक्षाने जाहीरनाम्यात याची माहिती दिली असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकKarnataka Lok Sabha Election 2019कर्नाटक लोकसभा निवडणूक 2019kolar-pcकोलारRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी