शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"थोडी प्रतिक्षा करा व काय घडते आहे ते पाहा"; काँग्रेसच्या नाराज नेत्यांची लवकरच बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 07:25 IST

काँग्रेसने दहा नेत्यांची एक समिती स्थापन केली. त्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांतील प्रत्येकी पाच काँग्रेस खासदारांना या समितीत घेण्यात आले. त्यात राहुल गांधी समर्थकांचा भरणा आहे.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : काँग्रेसला ऊर्जितावस्था प्राप्त व्हावी यासाठी पक्षसंघटनेत मोठे बदल करण्याचा आग्रह धरणारे व त्यासाठी संघर्ष करणाऱ्या २३ नेत्यांनी मांडलेले मुद्दे पक्षश्रेष्ठींनी फारसे विचारात न घेतल्याने हे नेते विलक्षण नाराज झाले आहेत. त्यामुळे आपले पुढचे पाऊल काय असावे हे ठरविण्यासाठी या नाराज नेत्यांची पुढच्या आठवड्यात एक बैठक होणार असल्याचे कळते.

काँग्रेसने दहा नेत्यांची एक समिती स्थापन केली. त्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांतील प्रत्येकी पाच काँग्रेस खासदारांना या समितीत घेण्यात आले. त्यात राहुल गांधी समर्थकांचा भरणा आहे. या सर्व बाबी नाराज नेत्यांना खटकल्या आहेत. पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी ठोस पावले उचलण्याकरिता काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर दबाव आणण्याच्या दृष्टीने नाराज नेते नवी रणनीती आखत आहेत असे या नेत्यांच्या निकटवतीर्यांनी सांगितले.

संसदेचे आगामी अधिवेशन १४ सप्टेंबरपासून ते १ ऑक्टोबर या कालावधीत होणार असून, त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील नाराज नेत्यांच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल घडावेत यासाठी नेमके काय करता येईल याबाबत या नाराज नेत्यांमध्ये दररोज चर्चा सुरू आहे. अशा संवादासाठी या नेत्यांनी एक गट स्थापन केला असून त्यामध्ये गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, भूपिंदर सिंह हूडा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी यांचा समावेश आहे. या गटातील नेत्यांची पुढील आठवड्याच्या प्रारंभी एक बैठक होणार असून त्यात भविष्यातील रणनीती ठरविली जाईल.

लोकसभेत काँग्रेसच्या उपनेतेपदी मनीष तिवारी किंवा शशी थरूर यांना डावलून तुलनेने नवीन असलेले खासदार गौरव गोगोई यांची निवड करण्यात आली हे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना फारसे आवडलेले नाही. दररोजच्या टिष्ट्वटमुळे पक्ष मजबूत होणार नाही. नाराज नेत्यांपैकी एका नेत्याने लोकमतला सांगितले की, लोकसभा व राज्यसभेसाठी पक्षश्रेष्ठींनी ज्या पद्धतीने दोन समित्या स्थापन केल्या, त्यामुळे आम्ही नाखूष आहोत. राहुल गांधी रोज करत असलेल्या टिष्ट्वटमुळे पक्षाला उर्जितावस्था प्राप्त होणार नाही. या टिष्ट्वट्नी अथवा तळागाळातील कार्यकर्त्यांनी केलेले काम यापैकी कशामुळे काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होईल हेही आम्हाला पाहायचे आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी दररोज संवाद साधावा अशी पक्षकार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. तशी कृती पक्षाकडून होते का याची आम्ही वाट पाहात आहोत.गुलाम नबी आझाद व कपिल सिब्बल हे पक्षसंघटनेबाबत त्यांची मते प्रसारमाध्यमांद्वारे मांडून काँग्रेस अध्यक्षांवरील दबाव वाढवत आहेत. पक्षश्रेष्ठींना नाराज नेत्यांनी पाठविलेल्या पत्राचा मसुदा तयार करणारे काँग्रेस नेते आनंद शर्मा यांना पक्षातील सध्याच्या वातावरणाबद्दल प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, थोडी प्रतिक्षा करा व काय घडते आहे ते पाहा.

बिहारमधील काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख अखिलेश प्रसाद यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठींना पाठविलेल्या पत्रावर मीही स्वाक्षरी केली आहे. आम्ही बिहारमधील विधानसभा निवडणुका जिंकू शकतो पण त्यासाठी योग्य दिशेने कृती झाली पाहिजे.पत्रावर स्वाक्षरी करणारे काँग्रेसमधील २३ नेतेकाँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य : गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मुकुल वासनिक, जितीन प्रसादमाजी मुख्यमंत्री : भूपिंदरसिंह हुडा, वीरप्पा मोईली, पृथ्वीराज चौहान, राजिंदरकौर भट्टलराज्यसभेचे खासदार : कपिल सिब्बल, विवेक तनखा, अखिलेश प्रसाद सिंहलोकसभेचे खासदार : मनीष तिवारी, शशी थरूरमाजी मंत्री : पी. जे. कुरियन, रेणुका चौधरीमाजी मुख्यमंत्री, मंत्र्यांचे पुत्र : संदीप दीक्षित, अजय सिंह, मिलिंद देवरामाजी प्रदेशाध्यक्ष : राज बब्बर (उत्तर प्रदेश), अरविंदर सिंह लव्हली (दिल्ली), कौल सिंग ठाकूर (हिमाचल प्रदेश), हरयाणा विधानसभेचे माजी अध्यक्ष कुलदीप शर्मा, दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी