शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

West Bengal Election: पश्चिम बंगालमध्ये अखेरच्या टप्प्यातील मतदान; बीरभूममध्ये तृणमूलचा 'बाहुबली' अनुब्रत मंडल नजरकैदेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 8:09 AM

Bengal Vidhansabha Election : अनुब्रत मंडल हे बीरभूम जिल्ह्याचे तृणमूलचे अध्यक्ष आहेत. धक्कादायक म्हणजे नजरकैदेत असूनही मंडल हे सुरक्षा दलाच्या जवानांच्या डोळ्यात धूळ फेकत काही तास गायब झाल्याने खळबळ उडाली होती.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये धुरळा उडाला आहे. आज आठव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान होत आहे. मतदान सुरु होण्याच्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसचा बाहुबली नेते अनुब्रत मंडल (TMC Leader Anubrat Mondal) यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. त्यांना मंगळवार सायंकाळी ५ वाजल्यापासून मतदान संपल्यानंतरचा दुसरा दिवस शुक्रवारच्या सायंकाळी ७ वाजेपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे केंद्रीय सुरक्षा दलांचे जवान व एक मॅजिस्ट्रेट डोळ्यात तेल घालून अनुब्रत मंडलवर (Anubrat Mondal News)  लक्ष ठेवून आहेत. (EC puts TMC's Anubrata Mondal under ‘strict surveillance’ as Bengal nears last phase of polls.)

अनुब्रत मंडल हे बीरभूम जिल्ह्याचे तृणमूलचे अध्यक्ष आहेत. धक्कादायक म्हणजे नजरकैदेत असूनही मंडल हे सुरक्षा दलाच्या जवानांच्या डोळ्यात धूळ फेकत काही तास गायब झाल्याने खळबळ उडाली होती. पश्चिम बंगालमध्ये आज शेवटच्या आठव्या टप्प्यातील ३५ जागांवर मतदान सुरु झाले आहे. 

पश्चिम बंगालमध्ये आज होणाऱ्या मतदानात बीरभम जिल्ह्यातील ११ जागा येतात. यापैकी १० जागांची जबाबदारी आपण घेतो, दुबराजपूरची नाही, असे अनुब्रत यांनी ममता बॅनर्जींना सांगितले होते. यानंतर ममता यांनी ११ वी जागा म्हणजेच दुबराजपूरचा उमेदवारच बदलला होता. यावरून या जिल्ह्यात अनुब्रत यांचा किती दरारा आहे हे दिसून येते. २०१९ च्या लोकसभा आणि २०१६च्या विदानसभा निवडणुकीवेळीदेखील निवडणूक आयोगाने नजरकैदेत ठेवले होते. (Anubrata Mondal holds considerable sway over the district of Birbhum.)

आठव्या टप्प्यातील मतदानासाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या ६४१ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत यापैकी २२४ तुकड्या या एकट्या बीरभूम जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या आहेत. आज होणारे मतदान मुर्शिदाबाद ११, बीरभूम ११, मालदा ६ आणि कोलकाता ७ अशा जागांवर होत आहे.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१All India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जी