Vidhan Sabha Adhiveshan: विरोधकांच्या प्रतिअधिवेशनावर कारवाईनंतर देवेंद्र फडणवीस संतप्त, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 12:56 PM2021-07-06T12:56:47+5:302021-07-06T13:09:47+5:30

Vidhan Sabha Adhiveshan: सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार घालणाऱ्या भाजपाने सुरुवातीला विधिमंडळाच्या पायऱ्यांवर प्रतिविधानसभा आयोजित केली होती. त्यावर विधानसभा अध्यक्षांच्या आदेशाने कारवाई झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली.

Vidhan Sabha Adhiveshan: Undeclared emergency in Maharashtra, assassination of democracy by state government, Serious allegations of Devendra Fadnavis | Vidhan Sabha Adhiveshan: विरोधकांच्या प्रतिअधिवेशनावर कारवाईनंतर देवेंद्र फडणवीस संतप्त, म्हणाले...

Vidhan Sabha Adhiveshan: विरोधकांच्या प्रतिअधिवेशनावर कारवाईनंतर देवेंद्र फडणवीस संतप्त, म्हणाले...

Next

मुंबई - राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार घालणाऱ्या भाजपाने (BJP)सुरुवातीला विधिमंडळाच्या पायऱ्यांवर प्रतिविधानसभा आयोजित केली होती. (Vidhan Sabha Adhiveshan) त्यावर विधानसभा अध्यक्षांच्या आदेशाने कारवाई झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. (Undeclared emergency in Maharashtra, assassination of democracy by state government, Serious allegations of Devendra Fadnavis)

विरोधी पक्षाच्या प्रतिविधानसभेवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमचा आवाज कुणीही बंद करू शकत नाही. आम्ही याठिकाणी बोलणार. आज विधिमंडळाच्या सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षाने आणीबाणी लावण्याचा प्रकार केला. महाराष्ट्रात सध्या असं सरकार सत्तेवर आहे त्यांनी अघोषित आणीबाणी लागू केली आहे. राज्य सरकारकडून लोकशाहीची हत्या झाली आहे. मार्शल पाठवून पत्रकारांचे कॅमेरे काढून घेतले गेले. ज्या प्रकारे माध्यमांच्या प्रतिनिधींना ढकलाढकल करण्यात आली हे चुकीचे आहे. आम्ही प्रसंगावधान दाखवले नसते तर वेगळे चित्र दिसले असते, असे फडणवीस म्हणाले.

राज्य सरकारचा बुरखा फाटतोय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये चलबिचल निर्माण झालेली आहे. त्यामुळेच खोटे आरोप करून आमच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. त्यानंतर आज शांतपणे प्रतिअधिवेशन सुरू असताना पत्रकारांवर दंडुके चालवण्याचा प्रयत्न केला गेला. सरकारला लोकशाहीची चाड नाही. मात्र आम्ही लोकशाही जिवंत ठेवणारे लोक आहोत. त्यामुळे आम्ही विरोधात आवाज उठवत राहू, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर भाजपाने विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच प्रतिअधिवेशन घेण्यास सुरुवात केली. विरोधी पक्षाने केलेल्या या कृतीवर सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर विधानसभा तालिका अध्यक्षांच्या आदेशाने या प्रतिअधिवेशनावर कारवाई करण्यात आली होती. 
 

Web Title: Vidhan Sabha Adhiveshan: Undeclared emergency in Maharashtra, assassination of democracy by state government, Serious allegations of Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.