शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

Vidhan Sabha Adhiveshan: ...मग तुम्हाला काय इथे भजी-वडे तळायला बसवलंय?; देवेंद्र फडणवीसांचा रोखठोक सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 13:53 IST

Vidhan Sabha Adhiveshan Live Update: सगळं काम केंद्र सरकारने करायचं, तर मग तुम्हाला काय भजी-वडे तळायला बसवलंय, असा बोचरा सवाल फडणवीस यांनी यावेळी ठाकरे सरकारला विचारला.

मुंबई - तालिका अध्यक्षांनी १२ आमदारांच्या केलेल्या निलंबनानंतर विधानसभा अधिवेशनात भाजपाने सत्ताधाऱ्यांविरोधात अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे. (Vidhan Sabha Adhiveshan) दरम्यान, विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील प्रतिअधिवेशनावर कारवाई करण्यात आल्यानंतर भाजपाने माध्यमांच्या कक्षात जाऊन प्रतिविधानसभा आयोजित केली. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आक्रमक रूपात विरोधीपक्ष नेत्याचे भाषण करून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. सगळं काम केंद्र सरकारने करायचं, तर मग तुम्हाला काय भजी-वडे तळायला बसवलंय, असा बोचरा सवालही फडणवीस यांनी यावेळी ठाकरे सरकारला विचारला. (Devendra Fadanvis Criticize Mahavikas Aghadi Government)

देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले की, आम्ही विविध विषयावर प्रश्न उपस्थित करून सरकारची पोलखोल करत असल्याने सत्ताधाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू आहे. आज १२ वाजता प्रतिविधानसभेत मी बोलणार म्हणून मार्शलना पाठवून आम्हाला हटवण्यात आले. मात्र आमचा आवाक कुणीही बंद करू शकत नाही. सरकारला लोकशाहीची चाड नाही. मात्र आम्ही लोकशाही जिवंत ठेवणारे लोक आहोत. त्यामुळे आम्ही विरोधात आवाज उठवत राहू. हे सरकारच सर्वच बाबतीती अपयशी ठरले आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

ते म्हणाले की, या सरकारमुळे महाराष्ट्र कोरोनाची राजधानी बनली आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी ६० लाख रुग्ण हे महाराष्ट्रमध्ये सापडले आहेत. राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडाही मोठा आहे. त्यातही एकूण मृत्यूंपैकी निम्मे मृत्यू हे एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांत झाले आहेत. आज सरकारने तीन कोटी लसींची मागणी करणारा ठराव मंजूर केला आहे. मात्र आतापर्यंत राज्यात जे लसीकरण झाले त्या लसी आल्या कुठून जमिनीतून आल्या की आकाशातून पडल्या, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.

या सरकारला शेतकऱ्यांचे शाप लागणार आहेत. त्यांना राजकारणात  राजकारणात जागा राहणार नाही. अमरावती जिल्ह्यात दोन दिवसांत सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यात शेतकऱ्यांच्या भयानक प्रमाणात आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांना नागवलं जातंय, तर वारकऱ्यांना जेरबंद केलं जातंय. मुघल, इंग्रजांना जमलं नाही ते ठाकरे सरकारनं करून दाखवलं आहे. या राज्यात खुन्यांना, बलात्काऱ्यांना अटक होत नाही. मात्र वारकऱ्यांना अटक होत आहे. काय मर्दुमकी आहे या सरकारची. पन्नासपेक्षा कमी लोकांमध्ये वारी करतो, परंपरा जपायची आहे, एवढीच मागणी वारकऱ्यांकडून करण्यात आली होती. मात्र बंडातात्या कराडकरांना अटक करण्यात आली. आजही अनेक वारकरी नेते आणि संत पोलिसांच्या पहाऱ्यात आहेत, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी संत जनाबाईंचा अभंग एक अभंग वाचून दाखवला.पुण्यवंत पाताळ लोकीं नेला । दरिद्री तो भाग्यवंत केला । चोरटयाचा बहुमान वाढविला । कीर्तिवानाचा अपमान केला

दरम्यान, प्रत्येक बाबतीत केंद्र सरकारकडे बोट दाखवण्यावरूनही देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांना मदत केंद्र सरकार करणार, कर्जमाफी केंद्र सरकार देणार, चक्रीवादळग्रस्तांना मदत केंद्र सरकार देणार, पीक विमा केंद्र सरकार देणार, राज्याचं अर्थकारण केंद्र सरकार चालवणार, मराठा आरक्षण केंद्र सरकार देणार, ओबीसी आरक्षण केंद्र सरकार देणार, पदोन्नतीतील आरक्षण केंद्र सरकार देणार, मेट्रोचं काम थांबलं तर त्या केंद्र सरकार जबाबदार ठरवणार, रेमडेसिवीर केंद्र सरकार देणार, पीपीई किट केंद्र सरकार देणार, ऑक्सिजनचा  पुरवठा केंद्र सरकार करणार, लसीकरण केंद्र सरकार सुरू करणार, असं सगळं जरतसेच आता जर सगळं काम जर केंद्र सरकारने करायचं आणि यांनी इथे केवळ वसुल्या करायच्या का. या सरकारच्या प्रत्येक विभागातला वाझे जर समोर आणला तर या सरकारमध्ये काय चाललंय ते समजेल, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

केंद्र सरकारने करायचं, तर मग तुम्हाला सत्तेवर काय भजी-वडे तळायला बसवलंय का? अशा प्रकारचे राज्यकर्तेच पाहिले नाहीत, ज्यांना आत्मविश्वास नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण