शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

इतका पुळका आहे, तर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही?; शिवसेनेचा भाजपला सवाल

By कुणाल गवाणकर | Updated: October 26, 2020 12:50 IST

स्वातंत्रवीर सावरकरांवरून टीका करणाऱ्या भाजपला संजय राऊत यांचा रोखठोक सवाल

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल दसरा मेळाव्यात घणाघाती भाषण करत भाजपचा जोरदार समाचार घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात घेण्यात आलेल्या या मेळाव्यातील भाषणावर आता भाजपनं जोरदार टीका केली आहे. सावरकर सभागृहात भाषण करणारे मुख्यमंत्री सावरकरांबद्ल एकही शब्द का बोलले नाहीत? बहुधा त्यांना त्यांच्या नव्या मित्रांची भीती वाटत असावी, अशा शब्दांत भाजपनं मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधलं. भाजपकडून होत असलेल्या या टीकेला आता शिवसेनेनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.स्वातंत्रवीर सावरकर यांच्या अपमानावर शिवसेना कधीही गप्प बसलेली नाही आणि यापुढेही बसणार नाही. त्यासाठी हवं तर इतिहास चाळून पाहा. सावरकर शिवसेनेचे आदर्श आणि मार्गदर्शक आहेत. सावरकरांवरून शिवसेनेला प्रश्न विचारणाऱ्यांनी आधी शिवसेनेच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असं संजय राऊत म्हणाले. 'सावरकरांचा पुळका असल्याचं दाखवणारे त्यांना भारतरत्न का देत नाहीत? गेल्या ६ वर्षांत अनेकांना भारतरत्न दिले गेले. मग सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? त्यात कोणत्या अडचणी येत आहेत?', असे सवाल राऊत यांनी उपस्थित केले.सावरकरांवरून शिवसेना वि. भाजप सामनाउद्धव यांनी सावरकर सभागृहातून भाषण केलं. पण त्यांच्या भाषणात सावरकरांबद्दल एकही शब्द नव्हता. बहुधा त्यांना त्यांच्या नव्या मित्रांची भीती वाटत असावी, अशी टीका भाजप आमदार राम कदम यांनी केली. हिंमत असेल तर महाविकास आघाडी सरकार पाडून दाखवा, असं थेट आव्हान त्यांनी भाजपला दिलं. भाजप आमदार राम कदम यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 'शिवसेनेनं सावरकर सभागृहात दसरा मेळाव्याचं आयोजन करून हिंदुत्वाबद्दलचे धडे दिले. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एका शब्दानंही सावरकरांची प्रशंसा का केली नाही, हा प्रश्न आहे. बहुधा ते आपल्या नव्या मित्रांना घाबरत असावेत. त्यांचे नवे मित्र सावरकरांबद्दल वारंवार अपमानास्पद विधानं करतात,' असं कदम म्हणाले. हाच काळाचा न्याय- केशव उपाध्येअनेक वर्षे हिंदुत्वाशी तडजोड नाही अशी भाषा करणारे उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी हिंदुत्वापासून दूर गेलेच. पण ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काँग्रेसने टीका केली त्याबद्दल त्यावेळी अवाक्षरही न काढणाऱ्या ठाकरेंना आज सावरकर स्मारकात यावे लागले हाच काळाचा न्याय आहे, असा टोला भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्येंनी लगावला. 

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेRam Kadamराम कदम