शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रवीण राऊतच्या कंपन्यांत वर्षा राऊतही भागीदार? ईडीला संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2021 07:04 IST

ED on Varsha Sanjay Raut: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. ५ जानेवारीच्या चौकशीवेळी राऊत यांच्या पत्नीकडे याबाबत सविस्तर विचारणा केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पीएमसी बँकेतील ठेवीमुळे चर्चेत  आलेल्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊत यांची ७२ कोटींची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली. विशेष म्हणजे प्रवीण राऊत यांच्या चार कंपन्यांमध्ये वर्षा राऊत यांची भागीदारी असल्याचा संशय ईडीला आहे. ५ जानेवारीच्या चौकशीवेळी त्यांच्याकडे याबाबत सविस्तर विचारणा केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यातून वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर १२ वर्षांपूर्वी ५० लाख रुपये जमा करण्यात आले होते. त्याबाबत ईडीकडून त्यांच्याकडे गेल्या दीड महिन्यापासून विचारणा सुरू आहे. २९ डिसेंबरला त्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजाविण्यात आले होते. मात्र, त्यांनी त्यासाठी ५ जानेवारीपर्यंत मुदत वाढवून घेतली.

दरम्यानच्या काळात ईडीने शुक्रवारी प्रवीण राऊत आणि त्यांची पत्नी माधुरी यांच्या मालकीची ७२ कोटींची मालमत्ता जप्त केली. त्यांच्या अवनी कन्स्ट्रक्शनमध्ये आणि त्याच्याशी संलग्न   रॉयटर्स एंटरटेन्मेंट, एलएलपी आणि सनातन मोटर्स या अन्य तीन कंपन्यांमध्ये वर्षा यांची भागीदारी असल्याचा संशय ईडीला आहे. त्याबाबत  त्यांच्याकडे विचारणा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय