शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Uttarakhand : पुष्कर सिंह धामी होणार उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री, आज घेणार शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 16:30 IST

Uttarakhand New CM News Live : राज्याचे 11 मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी आज संध्याकाळी सहा वाजता शपथ घेणार आहेत.  

डेहराडून : तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर उत्तराखंडच्या नवीन मुख्यमंत्र्यांची घोषणा झाली आहे. उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राज्याचे 11 मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी आज संध्याकाळी सहा वाजता शपथ घेणार आहेत.  

कोण आहेत पुष्कर सिंह धामी?पुष्कर सिंह धामी हे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. तसेच, ते आरएसएसचे जवळचे मानले जातात. पुष्कर सिंह धामी हे ऊधमसिंह नगर जिल्ह्यातील खटीमा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पक्षातील तरुण आणि अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. 

पुष्कर सिंह धामी, माजी प्रदेशाध्यक्ष बिशनसिंग चुफाल किंवा त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यापैकी कोणीही उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड केली जाईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. दरम्याान, तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर दुपारी तीन वाजता देहरादूनमध्ये भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक बोलविण्यात आली आहे. अखेर या बैठकीत पुष्कर सिंह धामी यांचे नाव उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित झाले.

तीरथ सिंह रावत यांचा राजीनामादरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्या संबंधित बातम्या येत होत्या. उत्तराखंडमध्ये पुन्हा मुख्यमंत्री बदलू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अखेर तीरथ सिंह रावत यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. शुक्रवारी संध्याकाळी तीरथ सिंह रावत यांनी राज्यपाल बेबी रानी मौर्य यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला.

दोन जागा रिक्तउत्तराखंडमध्ये विधानसभेच्या दोन जागा गंगोत्री आणि हल्द्वानी रिक्त आहेत. तेथे पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. मात्र राज्यात पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात निवडणूक होणार असल्याने सदस्यत्वाचा एका वर्षापेक्षा कमी कालावधी उरला आहे. अशा परिस्थितीत कायदेतज्ज्ञांच्या मते निवडणूक घेणे हे निवडणूक आयोगाच्या म्हणण्यावर अवलंबून असेल.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपा