शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

UP Election 2022: “यूपीत भाजपचा पराभव म्हणजे भारताला ब्रिटिशांपासून मिळालेल्या स्वातंत्र्यापेक्षाही मोठी आझादी”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 16:11 IST

UP Election 2022: भाजपवाले समाजातील विविध समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याचे काम करत असल्याची टीका करण्यात आली आहे.

श्रीनगर: जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी पुन्हा एकदा भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपवाले समाजातील विविध समुदायांमध्ये द्वेषाची भावना पसरवत असून, ते इंग्रजांपेक्षेही वाईट आहे. उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये (UP Election 2022) भाजपचा पराभव होणे म्हणजे ब्रिटिशांपासून मिळालेल्या स्वातंत्र्यापेक्षाही मोठी बाब आहे, या शब्दांत मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपवर हल्लाबोल केला. 

भाजपच्या कार्यकाळात जम्मू आणि काश्मीर सुरक्षित नाही. सत्ताधारी भाजपने विरोधकांना घाबरवण्यासाठी, त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला. मात्र, देशातील तरुण वर्गाने न डगमगता, न घाबरता देशभरात मैत्रीची भावना समृद्ध करायला हवी आणि आव्हानांना निडरपणे सामोरे जावे, असे आवाहन मेहबुबा मुफ्ती यांनी केले आहे. 

यूपीत भाजपचा पराभव करणे हे ब्रिटिशांपासून मिळालेल्या स्वातंत्र्यापेक्षा मोठे

उत्तर प्रदेशातील भाजप पराभूत होऊन, या पक्षापासून मुक्त होणे, ही १९४७ पेक्षाही मोठी आझादी असेल, अशी टीका करत, उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे त्यांना (भाजप) औरंगजेब आणि बाबर आठवत आहेत. भाजपला हुसकावून लावण्याची संधी मिळाली आहे. १९४७ च्या भारताच्या स्वातंत्र्यापेक्षा ही मोठी आझादी असेल कारण त्यांना देशाची फाळणी करायची होती, या शब्दांत मुफ्ती यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 

दरम्यान, यूपी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. सर्वच पक्ष व्हर्चुअल रॅलीच्या माध्यमातून प्रचाराला लागत ४०३ उमेदवारांची यादी बनवण्याचे काम करत आहेत. अशावेळी निवडणुकीत लोकांचा कल जाणून घेण्यासाठी विविध पोल घेतले जातात. इंडिया टीव्ही ओपिनियन पोलमध्ये भाजपाला २३०-२३५ जागा मिळून पुन्हा उत्तर प्रदेशातील सत्तेत परतण्याचे संकेत मिळत आहेत. ओपिनियन पोलमध्ये समाजवादी पक्ष एकमेव पक्ष आहे जो भाजपाला टक्कर देताना दिसत आहे. समाजवादी पक्षाला १६०-१६५ जागा मिळतील असे सांगितले जात आहे. तर काँग्रेसला ३-७ आणि बसपाला २-५ जागा मिळण्याचा कौल आहे. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Mehbooba Muftiमेहबूबा मुफ्तीBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथ