शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

Shivsena: एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळलेत, लवकर आमच्यात घेऊ; नारायण राणेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 17:36 IST

मुंबई-ठाणे-वसई-विरार आमच्या हाती द्या. या भागचा विकास करुन दाखवू. माझ्यावर टीका केली तर मंत्रिपद मिळतं.

ठळक मुद्देमी ज्यांना शिवसेनेत आणलं ते माझ्यावर टीका करतात मी राज ठाकरेंचा मुद्दा खोडत नाही, राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोपाला समर्थन भाजपा-मनसे या दोन्ही पक्षांची युती झाल्यास आनंद होईल

वसई – राज्यात भाजपा-शिवसेना यांच्यात कुरघोडी सुरु असतानाच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं नारायण राणे मुंबई, कोकणच्या दौऱ्यावर आहेत. वसईत नारायण राणेंनी थेट एकनाथ शिंदेंचे नाव घेत ते शिवसेनेत कंटाळले असून त्यांना लवकर आमच्यात घेऊ. एकनाथ शिंदे केवळ सही पुरतेच मंत्री आहेत असा दावा केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी राणे म्हणाले की, शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांना केवळ सही पुरतं ठेवलं आहे. मातोश्रीच्या आदेशाशिवाय एकही सही करु शकत नाही. ते शिवसेनेत कंटाळले असून आमच्याकडे आले तर त्यांना घेऊ. इतकचं नाही तर मनात आणले तर ठाकरे सरकारचं विसर्जन करु असंही नारायण राणे म्हणाले आहेत.

तसेच मुंबई-ठाणे-वसई-विरार आमच्या हाती द्या. या भागचा विकास करुन दाखवू. माझ्यावर टीका केली तर मंत्रिपद मिळतं. मी ज्यांना शिवसेनेत आणलं ते माझ्यावर टीका करतात असं म्हणत नारायण राणेंनी नीलम गोऱ्हेंचा समाचार घेतला आहे.

भाजपा-मनसे युती झाल्यास आनंद

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीवाद वाढला या राज ठाकरेंच्या विधानावर पत्रकारांनी नारायण राणेंना प्रश्न विचारला असता राणेंनी मी राज ठाकरेंचा मुद्दा खोडत नाही असं म्हटलं. त्यानंतर भाजपा-मनसे युतीवर राणे यांनी दोन्ही पक्षांची युती झाल्यास आनंद होईल असंही म्हटलं.

नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेप्रकरणी ३२ गुन्हे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेत गुरुवारी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या प्रकरणी मुंबईत गुरुवारी १९ तर शुक्रवारी १३ असे एकूण ३२ गुन्हे दाखल करण्यात आले. या यात्रेच्या निमित्ताने मुंबईत जोरदार राजकीय वातावरण तापले होते. येत्या काळातही राजकीय वातावरण ढवळून निघण्याची  शक्यता आहे. मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून राणे यांनी यात्रेला सुरुवात केली. तेथून टीचर्स कॉलनी हायवे, सायन सर्कल, दादर, वरळी नाका, गिरगाव चौपाटी, हुतात्मा चौक, अशा विविध मार्गांतून त्यांची यात्रा गेली. या वेळी कोरोनासंबंधित लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन झालेले पाहावयास मिळाले.

त्यानुसार, मुंबई पोलिसांनी शहरातील विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर आणि गोवंडी पोलीस ठाण्यासह विविध पोलीस ठाण्यांत भादंवि कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम ५१ आणि मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये, एकूण ३२ गुन्हे दाखल केल्याची माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी दिली आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेRaj Thackerayराज ठाकरे