शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Amit Shah: देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गायब?; दिल्ली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 14:15 IST

‘Missing report’ filed against Amit Shah: लवकरच देशाच्या गृहमंत्र्यांना शोधलं जाईल आणि ते पुन्हा त्यांचे कर्तव्य निभावतील अशी अपेक्षा आहे असा चिमटाही NSUI नं भारतीय जनता पार्टी आणि अमित शहांना लगावला आहे.

ठळक मुद्दे अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत की, फक्त भाजपाचे?पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर अमित शहा बेपत्ता झाले आहेत. २०१३ पर्यंत सत्ताधारी नेते नागरिकांना उत्तर देण्यास जबाबदार होते. परंतु त्यानंतर देशात भाजपाचं सरकार आलं

नवी दिल्ली – संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. या संकटकाळात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यातच आता काँग्रेसनं देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेपत्ता असून त्यांच्या गायब होण्याची तक्रार थेट दिल्लीतील पोलीस ठाण्यात केली आहे.

काँगेसच्या नॅशनल स्टुड्येंट यूनियन ऑफ इंडियाने बुधवारी दिल्लीच्या पोलीस ठाण्यात अमित शहा बेपत्ता असल्याची तक्रार केली आहे. एनएसयूआय(NSUI) चे राष्ट्रीय महासचिव नागेश करियप्पा यांनी अमित अनिलचंद्र शहा बेपत्ता होण्याची तक्रार पोलीस ठाण्यात देताना म्हटलंय की, संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीने त्रस्त आहे आणि देशातील नागरिक या महामारीच्या संकटात अडकला आहे. अशावेळी प्रस्थापित नेत्यांनी केवळ भारत सरकार किंवा भाजपा सरकारलाच उत्तर देणे बंधनकारक नाही तर देशातील नागरिकांनाही उत्तर देणे कर्तव्य आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत २०१३ पर्यंत सत्ताधारी नेते नागरिकांना उत्तर देण्यास जबाबदार होते. परंतु त्यानंतर देशात भाजपाचं सरकार आलं. सत्तेत आल्यानंतर कार्यप्रणालीत बरेच बदल झाले. आता देशात काहीही झाले तरी त्याची जबाबदारी कोणताच नेता घेत नाही. आज कोरोनाच्या संकटकाळात देशाचे २ सर्वोच्च जबाबदार नेतृत्व गायब आहे. देशातील जनतेला त्यांनी निवडलेल्या लोकप्रतिनिधींची गरज आहे तेव्हा हे लोक गायब होतात असा टोला एनएसयूआयचे राष्ट्रीय सचिव आणि मीडिया प्रभारी लोकेश चुगने लगावला आहे.  

दरम्यान, अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत की, फक्त भाजपाचे? असा सवाल उपस्थित करत नागेश करियप्पा म्हणाले की, आम्ही कोरोना काळात लोकांना होत असलेल्या त्रासाबद्दल जाणतो. पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर अमित शहा बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे सध्याचे सरकार आणि त्यांचे सर्वोच्च नेतृत्व गायब झाल्याबद्दल आम्ही एनएसयूआयने ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. आम्हाला अपेक्षा आहे की, लवकरच देशाच्या गृहमंत्र्यांना शोधलं जाईल आणि ते पुन्हा त्यांचे कर्तव्य निभावतील अशी अपेक्षा आहे असा चिमटाही काँग्रेसने भारतीय जनता पार्टी आणि अमित शहांना लगावला आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहाcongressकाँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्या