शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला, आता श्रीनिवास वनगांना विधिमंडळात पाठवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 14:52 IST

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मुंबई- उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंनी राजेंद्र गावितांना शिवबंधन बांधलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही पत्रकारांशी संवाद साधला. श्रीनिवास वनगांना डावलल्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. श्रीनिवास वनगांना संसदेत पाठवायची माझी इच्छा होती. पण त्यांची विधिमंडळात काम करण्याची इच्छा आहे. श्रीनिवास वनगानं मला विधिमंडळात काम करू द्या, असं सांगितलं. त्याच्या इच्छेचा मी आदर राखतो, त्याला कोणत्याही मार्गानं आमदार म्हणून विधिमंडळात पाठवणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.उद्धव ठाकरेंनी गेल्या वर्षी झालेल्या पालघर पोटनिवडणुकीवरही भाष्य केलं. चिंतामण वनगांचं निधन झाल्यानं त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. लोकभावना प्रबळ होती. परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. युती म्हणून लढत असताना आमचे जास्तीत जास्त खासदार निवडून येणं गरजेचं आहे. आमच्या सुभाष भामरे, सुरेश प्रभू, प्रताप पाटील चिखलीकरांनाही भाजपानं उमेदवारी दिली आहे. त्यामुळेच राजेंद्र गावितांना पालघर मतदारसंघातून आम्ही उमेदवारी दिली, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.  

पालघर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढविणार हे आता स्पष्ट झालं आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं 25-23चा फॉर्म्युला तयार केला आहे. यावेळी भाजपानं पालघरची जागा शिवसेनेला सोडली आहे. चिंतामण वनगा यांचे गेल्या वर्षी जानेवारीत दिल्लीत निधन झाले होते. त्यानंतर त्या जागेसाठी त्यांचे पुत्र इच्छुक होते. परंतु भाजपानं त्यांना डावलून राजेंद्र गावितांना उमेदवारी दिल्यानं श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांनी पोटनिवडणूक लढवली होती.परंतु ते पराभूत झाले. मात्र त्यांनी भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांना चांगली टक्कर देत जवळपास अडीच लाख मतं मिळवली. त्यामुळे ही जागा शिवसेनेसाठी यंदा सोडण्यात आली. पण शिवसेनेकडून पालघरमध्ये यंदा पुन्हा भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित उमेदवारी मिळाली असून, ते शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक