शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

'एका तासापेक्षा जास्त प्रचार ममता बॅनर्जींसाठीही करणार नाही'; नुसरत जहाँ यांचा व्हिडीओ शेअर करत भाजपनं घेतली फिरकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 12:30 IST

West Bengal Election 2021 : पश्चिम बंगाल निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पडलं पार, भाजपनं तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ यांचा व्हिडीओ शेअर करत डिवचलं.

ठळक मुद्देपश्चिम बंगाल निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पडलं पारभाजपनं तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ यांचा व्हिडीओ शेअर करत डिवचलं.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं. तृणमूल काँग्रेस आपला गड राखण्याच्या प्रयत्नात आहे. तर पश्चिम बंगालमध्ये भाजपही आपली ताकद वाढवू पाहत आहे. अशातच दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडण्यात येत नाही. भाजपनं तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांची फिरकी घेतली आहे. भाजपनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच यात त्यांना आपला राग आवरला जात नसल्याचंही दिसून येत आहे. एका तासापेक्षा जास्त प्रचार तर मी ममता बॅनर्जींसाठीही करत नाही, असं म्हणतानाचा एक व्हिडीओ भाजपनं शेअर केला आहे. लवकरच पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. यासाठी नुसरत जहाँ या एक रोड शो करत होत्या. "मी एका तासापेक्षा जास्त कालावधीपासून प्रचार करत आहे. इतका तर मी ममता बॅनर्जींसाठीही करत नाही," असं त्या या रोड शोदरम्यान व्हिडीओत बोलताना दिसत आहे. यानंतर त्या गाडीतूनही खाली उतरल्याचं दिसत आहे. भाजप बंगालनं त्यांचा हा व्हिडीओ शेअर करत फिरकी घेतली आहे. "नुसरत जहाँ टीएमसी खासदार, मी एका तासापेक्षा जास्त प्रचार करू शकत नाही, इतकं तर मी ममता बॅनर्जींसाठीही करणार नाही," असं त्यांनी या व्हिडीओसह लिहिलं आहे. ममता बॅनर्जींची टक्कर यावेळी त्यांच्याच पक्षातून भाजपमध्ये सामील झालेल्या सुवेंदू अधिकारी यांच्याशी होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान २७ मार्च रोजी पार पडलं. दुसऱ्या टप्प्याचं मतदान १ एप्रिल रोजी पार पडेल. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१All India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जीnusrat jahanनुसरत जहाँBJPभाजपा