शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
2
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
3
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
4
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
5
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत
6
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
7
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
8
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
9
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
10
'सुशांत नाही तर...', 'पवित्र रिश्ता'ला 15 वर्षे पुर्ण होताच अंकिता लोखंडे झाली भावूक
11
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
12
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
13
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
14
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
15
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
16
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
17
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
18
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
19
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
20
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार

Nusrat Jahan Pregnancy: हे काय भलतंच! खासदार नुसरत जहाँ गर्भवती, नवऱ्यालाच माहिती नाही; ‘या’ भाजपा नेत्यासोबत अफेअर असल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 8:54 AM

Nusrat Jahan Pregnancy: बंगाली अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ गर्भवती असल्याचा दावा स्थानिक वृत्तवाहिन्यांनी केला असून आता भलतीच चर्चा रंगत आहे.

ठळक मुद्देनिखील जैन आणि नुसरत जहाँ यांचे लग्न मोडण्याच्या स्थितीत, गेल्या ६ महिन्यापासून निखील नुसरतसोबत राहत नाही अनेक महिन्यांपासून आमच्या दोघांचा काहीही संपर्क नाही असंही निखीलने सांगितले आहे.नुसरत जहाँने तिचा बॉयफ्रेंड उद्योगपती निखील जैनसोबत १९ जून २०१९ रोजी लग्न केले होते.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ(Nusrat Jahan) नेहमी चर्चेत राहणारी सेलेब्रिटी आहे. अभिनय क्षेत्रातील यशस्वी करिअर, निवडणूक निकाल आणि निखील जैन याच्याशी दुसऱ्या धर्मात केलेला विवाहामुळे नुसरत जहाँ कायम चर्चेत राहिली. पण आता नुसरत जहाँ भलत्याच एका कारणामुळं चर्चेत आहे. काही रिपोर्टसच्या दाव्यानुसार नुसरत जहाँ ही ६ महिन्याची गर्भवती(Nusrat Jahan Pregnant) आहे आणि तिचा नवरा निखील जैन(Nikhil Jain) याला ती गर्भवती असल्याची माहितीच नाही.

गेल्या काही दिवसांपासून नुसरत आणि निखील एकमेकांपासून वेगळे राहतात. या दोघांचे लग्न मोडण्याच्या स्थितीत आहे. नुसरत जहाँ गरोदर असल्याच्या बातम्या काही रिपोर्टमधून छापून आल्या आहेत. परंतु नुसरत आणि त्यांच्या कोणत्याही टीमकडून या बातमीला दुजोरा दिला नाही. परंतु सोशल मीडियावर यावर प्रचंड चर्चा सुरू आहे. अनेक बंगाली न्यूज रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे. नुसरत जहाँ गरोदर असल्याबाबत तिचा नवरा निखील जैन याला कोणतीच माहिती नाही.

ते मुलं माझं नाही?

ABP आनंदच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, निखील जैन आणि नुसरत जहाँ यांचे लग्न मोडण्याच्या स्थितीत आहे. गेल्या ६ महिन्यापासून निखील नुसरतसोबत राहत नाही यात नुसरत जहाँ जर गरोदर असेल तर ते मुलं माझं नाही असं निखीलनं म्हटलं आहे. इतकचं नाही तर अनेक महिन्यांपासून आमच्या दोघांचा काहीही संपर्क नाही असंही निखीलने सांगितले आहे.

यश दासगुप्तासोबत नुसरत जहाँ रिलेशनशिपमध्ये?

मागील काही दिवसांपासून नुसरत जहाँ ही बंगाली अभिनेता आणि भाजपा नेता यश दासगुप्तासोबत (Yash Dasgupta) रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. दोघांनाही अनेकदा एकत्र पाहिलं आहे. त्याचसोबत न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी दोघंही राजस्थानला गेले होते. मात्र या चर्चांवर नुसरत, निखिल आणि यश दासगुप्ता यांच्याकडून कोणतंही अधिकृत स्टेटमेंट आले नाही. नुसरतनं एका मुलाखतीत म्हटलं होतं की, माझ्या खासगी आयुष्याबद्दल सार्वजनिकरित्या चर्चा होऊ नये. लोकं नेहमी मला टार्गेट करतात त्यामुळे वैयक्तिक मुद्द्यांवर ती बोलू इच्छित नाही.

लग्नानंतर नुसरत जहाँ चर्चेत

नुसरत जहाँने तिचा बॉयफ्रेंड उद्योगपती निखील जैनसोबत १९ जून २०१९ रोजी लग्न केले होते. नुसरत आणि निखील यांचे लग्न हिंदू, इस्लाम प्रथा परंपरेनुसार झालं होतं. लग्नानंतर नुसरत जहाँने कपाळात सिंदूर लावून दुर्गा पुजेतही सहभागी झाली होती. तेव्हा अनेक कट्टरतावादी मुस्लिमांनी नुसरत जहाँवर टीकास्त्र सोडलं होतं. त्याला नुसरत जहाँनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.   

 

टॅग्स :nusrat jahanनुसरत जहाँBJPभाजपा