शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कुठेही शाखा नाही, अशी काँग्रेसची स्थिती-फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 05:23 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खोचक टीका

श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या संगमनेर येथील दौऱ्यापूर्वीच काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांसह जिल्हाध्यक्षांनी पदे सोडली. जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीही बरखास्त करण्याची नामुष्की आली. आता या पक्षाची आमची कुठेही शाखा नाही, अशी परिस्थिती झाली आहे, अशी खोचक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.शुक्रवारी श्रीरामपूरच्या थत्ते मैैदानात झालेल्या सभेत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांचे भाषण व काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे काल्पनिक कथा व मनोरंजन बनले आहे. त्याचा वास्तवतेशी काहीही संंबंध नसतो. त्यामुळे मतदारांनी ते फार मनावर घेऊ नये. ते देशाच्या जवानांच्या कामगिरीवर शंका घेतात. बालाकोटमधील हवाई हल्ल्याची जगाला खात्री पटलेली असताना राहुल गांधी व पाकिस्तान हे दोघेच प्रश्न उपस्थित करतात. देशद्रोहासारखा कायदा हटविण्याची भाषा ते करीत आहेत. संविधान व तिरंग्याच्या अपमानासह, तसेच नक्षलवादी व माओवादी वृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त करणारा कायदा मागे घेण्याची घोषणा करून काँग्रेस सुरक्षेच्या प्रश्नाशी खेळत आहे. केंद्रातील मोदी सरकारने जनधन खाती उघडली. त्यात ८० हजार कोटी रूपये जमा केले. शौचालये, घरकुले, गॅस अनुदानाचे पैैसे त्यात थेट जमा केले जातात. त्यामुळे सरकारी पातळीवरील भ्रष्टाचार थोपविण्यात यश आले आहे. काँग्रेस सरकार केवळ गरिबी हटावच्या घोषणा करते. गरिबांना ७२ हजार रुपये देऊ असे सांगते. मात्र राहुल यांचे आजोबा, आजी, वडील, आई यांना सत्ता देऊनही गरिबी दूर झाली नाही.‘विखेंना भाजपत घेऊ’डॉ. सुजय विखे म्हणाले, काँग्रेस उमेदवार भाऊसाहेब कांबळे व अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे हे दोघेही आमचेच उमेदवार आहेत. त्यांची किती ताकद आहे व ते किती पाण्यात आहे, हे आम्हाला चांगले माहीत आहे. आपल्या वडिलांना लवकरच पक्षात घेऊ. डॉ. विखे यांच्या या वक्तव्यामुळे राधाकृष्ण विखे हे भाजपात प्रवेश करणार, याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. राधाकृष्ण विखे पाटील शनिवारी दुपारी बारा वाजता लोणीत राजकीय भूमिका स्पष्ट करणार का? याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेस