शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'तत्कालीन फडणवीस सरकारकडून मराठा समाजाची घोर फसवणूक', हसन मुश्रिफांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 15:37 IST

Hasan Mushrif : सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे, असे म्हणत राज्याला आरक्षण टिकवता आले नाही, असे म्हणणारे आता गप्प का आहेत? असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

कोल्हापूर : केंद्र सरकारकडून मराठा आरक्षणासाठी दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. दरम्यान, 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला अधिकारच उरला नसल्याचे आम्ही वारंवार सांगत होतो. तरीही तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारनेच मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे, असा हल्लाबोल राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. 

शुक्रवारी हसन मुश्रीफ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे, असे म्हणत राज्याला आरक्षण टिकवता आले नाही, असे म्हणणारे आता गप्प का आहेत? असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केली आहे. तसेच, हे लोक सत्तेवर आल्यावरच इम्पिरीकल डाटा मिळणार आहे का?, असा सवाल करत इम्पिरीकल डाटा मिळावा म्हणून अधिवेशनात ठराव मंजूर करण्यात येणार आहे, अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

याचबरोबर, मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय महाविकास आघाडी सरकार स्वस्थ बसणार नाही. सत्तेवर आलेल्या पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करण्याचा ठराव करणारा भाजपा हा पहिलाच पक्ष आहे. जनता हे फार काळ सहन करत नाही, असेही हसन मुश्रीफ म्हणाले.

संभाजी ब्रिगेडची घोषणाबाजीहसन मुश्रीफ यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सभागृहात घुसले. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. त्यामुळे मुश्रीफ यांना पत्रकार परिषद थांबवावी लागली. मात्र, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्याने पत्रकार परिषद सुरू झाली.

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaratha Reservationमराठा आरक्षण