शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

...तर भाजपा ममता बॅनर्जींची हत्या करेल; पश्चिम बंगालच्या मंत्र्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 11:16 IST

west Bengal News: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि पश्चिम बंगालचे नेते कैलास विजयवर्गिय यांच्या ताफ्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठमोठे दगड फेकले होते. या हल्ल्यातून नड्डा यांची कार बुलेटप्रूफ असल्याने वाचली होती. मात्र, विजयवर्गीय यांच्या कारचा काचा फोडून हे दगड आतमध्ये घुसले होते.

कोलकाता : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावरील झालेल्या हल्ल्याने पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तणावाचे झाले आहे. भाजपा-टीएमसी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. आता टीएमसीच्या नेत्याने भाजपावर गंभीर आरोप केला आहे. जर येती विधानसभा निवडणूक भाजपा जिंकली नाही तर गुप्तपणे लोकांना पाठवून ममता बॅनर्जी यांची हत्या करू शकते, असा आरोप मंत्री सुब्रत मुखर्जी यांनी केला आहे. 

राज्यात आयोजित करण्यात आलेल्या एका सभेमध्ये ते बोलत होते. (West Bengal Assembly Election) सुब्रत मुखर्जी हे ममता यांच्या सरकारमध्ये पंचायत राज आणि ग्रामविकास मंत्री आहेत. 

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि पश्चिम बंगालचे नेते कैलास विजयवर्गिय यांच्या ताफ्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठमोठे दगड फेकले होते. या हल्ल्यातून नड्डा यांची कार बुलेटप्रूफ असल्याने वाचली होती. मात्र, विजयवर्गीय यांच्या कारचा काचा फोडून हे दगड आतमध्ये घुसले होते. विजयवर्गीय यांनी हे दगड हातांनी थोपवत स्वत:ला वाचविले होते. यामध्ये त्यांना दुखापत झाली होती. गुरुवारी नड्डा हे ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या लोकसभा मतदारसंघात डायमंड हार्बरमध्ये जात होते. यावेळी हा हल्ला करण्यात आला होता. दगडफेकीच्या घटनेला केंद्र सरकारने गंभीरपणे घेतले असून राज्यपाल जगदीप धनखड़ यांच्याकडून अहवाल मागविला होता. धनखड यांचा अहवाल मिळताच केंद्राने तातडीने बंगालचे डीजीपी आणि मुख्य सचिवांना दिल्लीला बोलवून घेतले असून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे संकेत राज्यपालांनी दिले आहेत. 

भाजपा कार्यकर्त्याचा हल्ल्यात मृत्यूपश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) यांच्यातील संघर्ष पेटला आहे. उत्तर 24 परगना येथील हलिशहरमध्ये टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा दावा करत हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीररित्या जखमी झाल्याचे भाजपाने म्हटले आहे. भाजपाने यासंदर्भात ट्विट केले आहे. "आणखी एक दिवस, आणखी एक हत्या. हलिशहरमध्ये कार्यकर्ता सैकत भवाल यांची टीएमसीच्या गुंडांनी निर्घृण हत्या केली, तर 6 जण गंभीर जखमी झाले. जखमींना कल्याणीच्या जेएन मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पार्टीचे डोर टू डोर कॅम्पेन करत असताना सैकत भवाल यांच्यावर हल्ला झाला," असे ट्विट करण्यात आले आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालMurderखूनBJPभाजपा