शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

...म्हणून महाविकास आघाडी सरकार कोसळणार; दानवेंनी सांगितली तीन प्रमुख कारणं

By कुणाल गवाणकर | Updated: November 25, 2020 18:53 IST

राज्यात लवकरच सत्तांतर होणार; रावसाहेब दानवेंचा पुन्हा दावा

मुंबई: राज्यातलं महाविकास आघाडी सरकारचं दोन महिन्यांत कोसळेल आणि सत्तांतर होईल, असा दावा भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. दानवेंच्या विधानाचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी जोरदार समाचार घेतला. दानवेंना ज्योतिषशास्त्र कळतं याची माहिती नव्हती, असा खोचक टोला त्यांनी लगावला. यानंतर आता दानवेंनी त्यांच्या सत्तांतराबद्दलच्या विषयावर सविस्तर भाष्य केलं आहे.शरद पवारांनी ‘ज्योतिषी’ म्हणून उडवली होती खिल्ली, आता रावसाहेब दानवेंनी दिलं असं  उत्तर; म्हणाले…राज्यात दोन महिन्यात सत्तांतर कसं होणार, याबद्दल दानवेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर महाविकास आघाडी सरकार त्यांच्यातल्या मतभेदांमुळेच कोसळेल, असं दानवे म्हणाले. 'जनतेची नाराजी, समन्वयाचा अभाव आणि बेबनाव ही महाविकास आघाडी सरकार कोसळण्यामागची तीन प्रमुख कारणं असतील. वैचारिक मतभेद असलेली अशी सरकारं कोसळत असल्याचं आम्ही गेल्या ३५ वर्षांमध्ये अनेकदा पाहिलं आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहारमध्ये याच कारणांमुळे सरकारं पडली आहेत,' असं संदर्भ दानवेंनी दिले.येत्या दोन महिन्यांत राज्यात भाजपाचे सरकार सत्तेत येईल; दानवेंचा दावासध्या सरकारमधील तीन पक्षांमध्ये एकमेकांबद्दल नाराजी असल्याचा दावा केला. 'काँग्रेसला वाटतं या सरकारमध्ये आपल्याला कोणी विचारत नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचा, तर महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे. त्यामुळे काँग्रेस नाराज आहे. राष्ट्रवादीनं सगळी महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवली आहेत. मुख्यमंत्रिपद असूनही शिवसेना अडचणीत आहे. कारण महत्त्वाची खाती त्यांच्याकडे नाहीत. त्यामुळे सरकारमध्ये त्यांचं काहीच चालत नाही,' असे दावे त्यांनी केले.दोन महिन्यांत राज्यात सत्तांतर होईल. तशी जुळवाजुळव झालेली आहे, असं विधान दानवेंनी केलं. त्यामुळे भाजपनं नेमकी कोणती जुळवाजुळव केली आहे, असा प्रश्न अनेकांना पडला. त्याबद्दल विचारलं असता, आम्ही केलेली जुळवाजुळव अशी जाहीरपणे सांगू शकत नाही, असं दानवे म्हणाले. सरकार त्यांच्यातल्या मतभेदांमुळेच पडेल आणि त्यानंतर भाजप सक्षम सरकार देईल, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस