शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

"मंत्र्यांच्या अय्याशीसाठी ठाकरे सरकारकडे पैशाची कमी नाही"; भाजप नेत्याचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 11:52 IST

"राज्याच्या तिजोरीतील खडखडाट हा फक्त जनतेसाठी असून मंत्र्यांच्या अय्याशीसाठी ठाकरे सरकारकडे पैशाची कमी नाही"

राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळातील एक निर्णय रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. राज्याच्या तिजोरीतील खडखडाट हा फक्त जनतेसाठी असून मंत्र्यांच्या अय्याशीसाठी ठाकरे सरकारकडे पैशाची कमी नाही, अशी घणाघाती टीका भातखळकर यांनी केली आहे.

"जनमताचा नाही ठिकाणा अन् मला मुख्यमंत्री म्हणा..."

मंत्र्यांच्या विदेशवारीमुळे होणारी पैशाची उधळपट्टी रोखण्यासाठी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेश दौऱ्यांवर होणाऱ्या खर्चांवर निर्बंध आणले होते. फडणवीसांच्या या निर्णयाला स्थगिती ठाकरे सरकारने दिल्याचं वृत्त अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमधून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. "मंत्र्यांच्या विदेशवारीमुळे होणारी पैशाची उधळपट्टी रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात आणलेले निर्बंध मुख्यमंत्री ठाकरे यांनी रद्द केले. थोडक्यात, तिजोरीला खडखडाट फक्त जनतेसाठी आहे. मंत्र्यांच्या अय्याशीसाठी पैशाची कमी नाही", असं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे. 

शरजील हा ठाकरे सरकारचा जावई आहे का?- भातखळकरपुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने केलेल्या विधानानेही राज्याचं राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. हिंदू समाज सडलेला असल्याच्या शरजीलच्या विधानावरुन भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. शरजीलविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करत राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना काल आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर आज उस्मानी विरोधात एफआयआर दाखल करुन घेण्यात आली आहे. सरकारच्या या भूमिकेवरुनही भातखळकर यांनी निशाणा साधला. "शरजील उस्मानी ठाकरे सरकारचा जावई आहे का?", असा सवाल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. 

भाजपच्या आंदोलनानंतर एफआयआर दाखल करण्यात आल्याचंही भातखळकर यांनी म्हटलं आहे. "एफआयर दाखल झाला असला तरी त्याला अटक अद्याप झालेली नाही. या जिहादी भामट्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल का केला नाही? मुळात भामट्यांची गर्दी असलेल्या चिथावणीखोर एल्गार परिषदेला परवानगी का दिली?", असे सवाल भातखळकर यांनी उपस्थित केले आहेत. 

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना