शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

"ठाकरे सरकार सेक्युलर राहिले नाही", मुख्यमंत्र्यांच्या त्या विधानावरून महाविकास आघाडीत असंतोष उफाळला

By बाळकृष्ण परब | Published: March 04, 2021 1:23 PM

Maharashtra Politics News: बुधवारी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या भाजपाच्या (BJP) नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेमध्ये बाबरी मशिदीवरून केलेले विधान अयोग्य होते महाविकास आघाडीमधील मुस्लिम नेत्यांनी या विधानाचा निषेध करून राजीनामे द्यायला हवेतउद्धव ठाकरे हे आता केवळ शिवसेना पक्षप्रमुख राहिलेले नाहीत. ते राज्याचे प्रमुख आहेत

मुंबई  - बुधवारी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या भाजपाच्या (BJP) नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही मुख्यमंत्र्यांनी भाजपावर चौफेर हल्लाबोल केले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी सभागृहामधून हिंदुत्व आणि बाबरी मशिदीबाबत (Babri Masjid) बोलणे शिवसेनेच्या महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांना फारसे रुचलेले नाही. मुख्यमंत्री आता केवळ पक्षप्रमुख राहिलेले नाहीत. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी बाबरी मशिदीबाबत केलेले विधान अयोग्य होते, अशी टीका महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केले आहे.  (The Thackeray government did not remain secular, Abu Azami Criticize Uddhav Thackeray for His Statement on Babri Masjid)अबू आझमी म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेमध्ये बाबरी मशिदीवरून केलेले विधान अयोग्य होते. महाविकास आघाडीमधील मुस्लिम नेत्यांनी या विधानाचा निषेध करून राजीनामे द्यायला हवेत. उद्धव ठाकरे हे आता केवळ शिवसेना पक्षप्रमुख राहिलेले नाहीत. ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी असे विधान करता कामा नये होते. सरकारमध्ये असलेल्या मुस्लिम नेत्यांना या विधानाची लाज वाटली पाहिजे. त्यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विधानाचा निषेध म्हणून राजीनामा दिला पाहिजे. असे आवाहन अबू आझमी यांनी केले.   दरम्यान, काल विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपावर घणाघाती टीका केली होती. "भाजपनं आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. तेवढी तुमची पात्रता नाही. ज्या बाळासाहेबांचा उल्लेख तुम्ही करत आहात. त्याचं हिंदुत्व हे काही  शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नव्हतं. बाबरी मशिदी पाडली गेली तेव्हा सर्व 'येर गबाळे' पळून गेले होते. एकटे बाळासाहेब आक्रमकपणे उभे राहिले होते. त्यामुळे भाजपनं हिंदुत्वाच्या गप्पा मारू नये. जम्मू-काश्मीरमध्ये युती करताना भाजपचं हिंदुत्व कुठं गेलं होतं?", असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. 

विधानसभा निवडणुकीआधी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांनी बंद दाराआड दिलेल्या वचनाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. "ज्या बाळासाहेबांची आठवण तुम्हाला आता होतेय. ज्या हिंदुत्वावर तुम्ही बोलत आहात. मग ज्या खोलीला आम्ही हिंदुत्वाचं मंदिर मानतो. त्या खोलीत अमित शहांनी दिलेलं वचन बाहेर आल्यावर तुम्ही निर्लज्जपणे नाकारता. याची लाज वाटायला हवी", असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले होते.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीAbu Azmiअबू आझमीShiv SenaशिवसेनाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी