शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तारीख कळवा, आम्ही तुमचे काय-काय फोडू ते पाहाच; गुलाबराव पाटील यांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 13:02 IST

Maharashtra politics: भाजपचे आमदार तथा व्यापारी असलेल्या प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची धमकी दिली आहे. लाड यांच्यासारख्या व्यापाऱ्याने अशी भाषा करणे योग्य नाही.

जळगाव : भाजपचे आमदार तथा व्यापारी असलेल्या प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची धमकी दिली आहे. लाड यांच्यासारख्या व्यापाऱ्याने अशी भाषा करणे योग्य नाही. मात्र, जर त्यांनी तसा इशाराच दिला असेल तर लाड यांनी आम्हाला तशी तारीख कळवावी, त्यांनी सेना भवन फोडण्याची हिंमत करून दाखवावी, आम्ही त्यांचे काय-काय फोडू हे त्यांना लक्षात आणून देऊ, असे थेट आव्हान जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लाड यांना दिले आहे. पाटील म्हणाले, राज्यात सत्तांतर होईल असे भाजपला वाटले, परंतु तसे होत नसल्याने आता काहीही करून वातावरण तापवण्याचा हा प्रकार आता भाजपकडून सुरू आहे. मागेही काही कारण नसताना भाजपचे काही कार्यकर्ते शिवसेना भवनावर चालून आले होते.गिरीश महाजनांनी जामनेरकडे पाहावे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी कोकणातील पूरग्रस्तांच्या मुद्द्यावरून राजकारण करू नये, ही वेळ राजकारण करण्याची नसून, पूरग्रस्तांची मदत करण्याची वेळ आहे. महाजन जामनेरमधून थेट कोकणात मदतीला जात आहे. त्यांचे अभिनंदन. मात्र, जामनेरमध्ये काय सुरू आहे? याकडेदेखील महाजनांनी लक्ष दिले पाहिजे, अशी टीकाही त्यांनी केली. 

माझ्यासाठी विषय संपला - प्रसाद लाडमुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना आम्ही दैवत मानतो. शिवसेना भवनाबद्दल बोलणे हे चुकीचेच झाले. पण, माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. त्यामुळे कालच मी यासंदर्भात व्हिडीओद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा विषय संपला आहे, असे भाजप आमदार प्रसाद लाड यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण