शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Tauktae Cyclone: केंद्र शासनाने गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला देखील भरीव मदत द्यावी: एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 21:38 IST

तौक्ते चक्रीवादळात महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला असून केंद्र सरकारने महाराष्ट्रातील नुकसानाची पाहणी करून गुजरात प्रमाणे महाराष्ट्रालाही भरीव मदत द्यावी.

अंबरनाथ: तौक्ते चक्रीवादळात महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला असून केंद्र सरकारने महाराष्ट्रातील नुकसानाची पाहणी करून गुजरात प्रमाणे महाराष्ट्रालाही भरीव मदत द्यावी. त्यासंदर्भात राज्य शासन देखील केंद्राकडे पाठपुरावा करणार आहेत. सोबतच ठाणे जिल्ह्यातील बाधीत शेतकरी आणि बाधित घरांचा पंचनामा करून त्यांना देखील योग्य मदत करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

अंबरनाथ तालुक्‍यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी नगर विकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आले होते. यावेळी फणशीपाडा भागात आदिवासी बांधवांच्या घरांच्या झालेली नुकसान आणि बारकुपाडा परिसरातील राज फासेपारधी लोकांच्या घरांचे झालेल्या नुकसानाची पाहणी पालक मंत्री यांनी केले. यावेळी ठाणे जिल्ह्या प्रमाणेच कोकणपट्टाला चक्री वादळाचा मोठा फटका बसला असून केंद्राने राज्याला गुजरात प्रमाणे भरीव मदत करणे अपेक्षित आहे. मात्र अद्याप केंद्राने कोणती मदत जाहीर न केल्याने राज्य शासनाला या संदर्भात पाठपुरावा करत असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

अंबरनाथ तालुक्‍यात संदर्भात नुकसानीचा अहवाल घेतला असता तालुक्यात दोन हजाराहून अधिक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून 365 हेक्टर शेत जमीन आणि फळ बागांमध्ये ेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. 932 शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान झाले असून त्याचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे ज्यांचे या चक्रीवादळात नुकसान झाले आहे त्यांना शासनामार्फत मदत केली जाईल असे शिंदे यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणाबाबत आरोप-प्रत्यारोप करू नये मराठा आरक्षणाबाबत काही लोक केंद्र आणि राज्य शासनावर आरोप करीत आहेत, मात्र ही वेळ आरोप-प्रत्यारोपांची नसून एकत्रितपणे निर्णय घेण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याची गरज आहे. राज्य शासन देखील केंद्र सरकारकडे या संदर्भात पाठपुरावा करत असून भोसले कमिटीच्या अहवालानुसार न्यायालयीन प्रक्रियेत देखील दाद मागण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ