शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

लोकसभा निवडणूक 2019: 'चर्चगेटवरुन ट्रेन पकडल्यावर काँग्रेसचा पहिला खासदार थेट पंजाबमध्ये सापडेल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 16:41 IST

भाजपा आमदाराचा काँग्रेसला टोला

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. या निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. तर भाजपानं घवघवीत यश मिळवत केंद्रातील सत्ता कायम राखली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांच्या नेतृत्त्वाखाली पक्षानं गेल्या निवडणुकीपेक्षा भव्यदिव्य यश मिळवलं. या विजयानंतर भाजपाचे गुजरातमधील आमदार हर्ष संघवींनी केलेलं ट्विट सोशल मीडियावर चर्चेत आहे. भाजपाच्या दणदणीत यशामुळे अनेक राज्यं काँग्रेसमुक्त झाली. तर काही राज्यांमध्ये काँग्रेस फक्त नावाला शिल्लक आहे. याच पार्श्वभूमीवर सूरतमधील मजुरा मतदारसंघाचे भाजपा आमदार हर्ष संघवी यांनी एक ट्विट केलं. 'तुम्ही चर्चगेटवरुन ट्रेन पकडली आणि उत्तरेच्या दिशेनं प्रवास करू लागलात, तर काँग्रेसचा पहिला खासदार तुम्हाला थेट पंजाबमध्ये सापडेल,' अशा शब्दांनी संघवींनी काँग्रेसला टोला लगावला. भाजपाच्या शानदार विजयानंतर त्यांनी हे ट्विट केलं. चर्चगेट स्थानक दक्षिण मुंबई मतदारसंघात येतं. या ठिकाणी शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरांचा पराभव केला. याशिवाय शिवसेना, भाजपानं मुंबईतील सर्वच्या सर्व 6 मतदारसंघांमध्ये विजय मिळवला. मुंबई सोडून उत्तरेकडे जाऊ लागल्यास मध्ये गुजरात, राजस्थान, हरयाणा ही राज्यं येतात. या सर्वच राज्यांमध्ये भाजपानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या ठिकाणच्या सर्व जागा भाजपानं जिंकल्या. पंजाबमध्ये मात्र काँग्रेसला चांगलं यश मिळालं. राज्यातील 13 पैकी 8 जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला. याच संदर्भानं संघवींनी ट्विट करून काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांच्या ट्विटला सोशल मीडियानं जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालBJPभाजपाcongressकाँग्रेसGujaratगुजरातHaryanaहरयाणा