शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
4
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
5
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
6
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
7
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
8
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
9
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
10
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
11
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
12
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
13
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
14
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
15
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
16
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
17
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
18
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
19
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे “मराठी भैय्ये” आता माफी मागणार का?; जितेंद्र आव्हाड कडाडले

By प्रविण मरगळे | Updated: October 4, 2020 14:55 IST

Sushant Singh Rajput, Jitendra Awhad on BJP News: पोलिसांना बदनाम करणारे "मराठी भैय्ये" आता माफी मागणार का? असा सवाल करत आव्हाडांनी भाजपा नेत्यांना घेरलं आहे.

ठळक मुद्देआमदार रोहित पवारांनंतर मंत्री जितेंद्र आव्हाडांनीही भाजपा नेत्यांना टार्गेट केलेसुशांत प्रकरणात काही न्यूज चॅनेल्स,मराठी भैय्ये आणि BJPच्या नेत्यांनी महाराष्ट्राची बदनामी केलीसुशांत सिंह राजपूतही हत्या नव्हे तर आत्महत्याच, एम्सच्या अहवालावरुन सत्ताधारी आक्रमक

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एम्सचा अहवाल आल्यानंतर आता सत्ताधारी नेत्यांकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांवर टीका करणं सुरु आहे. सुशांत प्रकरणावरुन विरोधकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात रान उठवलं होतं. सुशांत सिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलील दबावाखाली करत असून कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करतंय असा आरोप करण्यात येत होता.

त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर मुंबई पोलिसांकडून सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. दीड महिना उलटल्यानंतर या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहेत. यातच एम्स डॉक्टरांच्या अहवालानंतर सत्ताधारी नेत्यांकडून विरोधकांना लक्ष्य करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यापाठोपाठ मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणावरुन भाजपा नेत्यांना टार्गेट केले आहे.

याबाबत मंत्री जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केले आहे की, सुशांत प्रकरणात काही न्यूज चॅनेल्स,मराठी भैय्ये आणि BJPच्या नेत्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी केली.आता CBIने मान्य केलं आहे की,सुशांतने आत्महत्याच केलीय. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे "मराठी भैय्ये" आता माफी मागणार का? असा सवाल करत आव्हाडांनी भाजपा नेत्यांना घेरलं आहे.

एम्सचा अहवाल

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला जवळपास तीन महिने उलटले असून या प्रकरणी दर दिवशी नवीन खुलासे समोर येत आहे. १४ जून, २०२० रोजी सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. पण ही आत्महत्या आहे की हत्या, हे स्पष्ट झालेले नाही. आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दिल्ली स्थित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (All India Institute Of Medical Sciences, New Delhi)च्या डॉक्टरांच्या एका पॅनेलने सीबीआयला आपले मत देत सांगितले की अभिनेता सुशांत सिंग राजपूतची हत्या नाही झाली तर हे आत्महत्येचे प्रकरण आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी साडे तीन महिन्यानंतर आलेल्या आत्महत्येच्या थेअरीला एम्स फॉरेंसिक टीमचा फायनल रिपोर्ट म्हटले जात आहे. हा रिपोर्ट एम्सच्या पॅनेलने सीबीआयकडे सुपूर्द केला आहे, ज्याचा सीबीआय अभ्यास करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एम्सच्या फॉरेंसिक पॅनेलने सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी त्यांच्याकडून तपास पूर्ण केला आहे. इतकेच नाही तर सीबीआयला आपली वैद्यकीय आणि कायदेशीर मत देऊन फाइल बंद केली आहे. त्यानंतर आता सीबीआय एम्सच्या रिपोर्टसोबत त्यांच्या तपास जुळवून या प्रकरणाचा निष्कर्ष काढण्यात जुंपली आहे.

सीबीआयने अहवाल लवकर सादर करावा

याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख  म्हणाले की, आमच्याकडे अधिकृत माहिती नाहीय. जशी माहिती मिळेल तशी आम्ही ती कळवू. यामुळे यावर काही वक्तव्य करणे उचित नाही. सीबीआय जी चौकशी करत आहे, तिचा अहवाल लवकरात लवकर यावा, लोकांच्या समोर यावा, यामुळे लोकांनाही सुशांतची हत्या की आत्महत्या ते समजेल असं त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतJitendra Awhadजितेंद्र आव्हाडBJPभाजपाMumbai policeमुंबई पोलीसMaharashtraमहाराष्ट्र