शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

राज्य विधिमंडळाचे उद्यापासून अधिवेशन; विरोधक चहापानावर बहिष्कार टाकण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 6:42 AM

अधिवेशनातील रणनीती ठरविण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षांची बैठक रविवारी दुपारी होणार असून, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातर्फे आयोजित चहापानावर विरोधक बहिष्कार टाकतील, अशी दाट शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याशिवाय दोन्ही सभागृहांचे कामकाज चालू द्यायचे नाही, अशी भूमिका विरोधी पक्ष भाजपने घेतल्याने सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुद्द्यावरून रणकंदन अटळ दिसत आहे.

केवळ राठोडच नव्हे, तर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ज्यांच्या जावयाला ईडीने अटक केली ते अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, पोलीस मारहाण प्रकरणी मंत्री यशोमती ठाकूर, एका कार्यकर्त्याला घरी आणून मारहाण केल्याचा आरोप असलेले गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे विषयही आम्ही अधिवेशनात आणू, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले. विरोधकांच्या गोंधळाला सडेतोड उत्तर देण्याची तयारी महाविकास आघाडीने चालविली असून, गोंधळ न करता चर्चा करा, असे आव्हान विरोधकांना दिले आहे.

अधिवेशनातील रणनीती ठरविण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षांची बैठक रविवारी दुपारी होणार असून, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातर्फे आयोजित चहापानावर विरोधक बहिष्कार टाकतील, अशी दाट शक्यता आहे. राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये विविध मुद्द्यांवर सुरू असलेला संघर्ष लक्षात घेता भाजप चहापानाला जाईल, असे दिसत नाही. कोरोनाच्या काळात देण्यात आलेली वाढीव वीज बिले, शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी, मराठा आरक्षण, राज्यातील कायदा व सुव्यवस्था या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे.

संजय राठोड यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. नाहीतर रस्त्यावर आणि सभागृहातही संघर्ष अटळ आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून कोरोनातील भ्रष्टाचारापर्यंत अनेक मुद्दे आमच्याकडे आहेत.- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

संजय राठोड यांच्याबाबत जे काही घडत आहे, त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनभिज्ञ नाहीत. ते डोळे मिटून बसलेले नाहीत. मुख्यमंत्री हे मिस्टर सत्यवादी आहेत. ते कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत आणि कोणालाही पाठीशी घालणार नाहीत.- खा. संजय राऊत, शिवसेना नेते

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा