शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

‘सर्व प्रकारच्या गुन्ह्यांशी राज्य सरकारचे नाते’, चंद्रकांत पाटलांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 06:27 IST

Chandrakant Patil : पाटील म्हणाले, राज्यातील एक मंत्री अनैतिक संबंधाबद्दलची कबुली देतो. दुसऱ्या एका मंत्र्याचे नाव तरुणीच्या आत्महत्येशी जोडले जाते. ड्रग प्रकरणातही दिग्गज नेत्याच्या पुत्राचे नाव चर्चेत येते.

सांगली : सर्व प्रकारच्या गुन्ह्यांशी राज्य सरकारचे नाते जोडले गेले आहे. सत्ताधाऱ्यांनी शिवशाहीऐवजी केवळ ठोकशाही पद्धतीने राज्य चालविण्यास सुरुवात केली आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.पाटील म्हणाले, राज्यातील एक मंत्री अनैतिक संबंधाबद्दलची कबुली देतो. दुसऱ्या एका मंत्र्याचे नाव तरुणीच्या आत्महत्येशी जोडले जाते. ड्रग प्रकरणातही दिग्गज नेत्याच्या पुत्राचे नाव चर्चेत येते. एका मंत्र्याच्या बंगल्यात तरुणाला मारहाण केली जाते. अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सरकारमधील मंत्री व त्यांचे नातलग बदनाम होत असताना सरकार त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी दडपशाहीचे दर्शन घडवीत आहे. राज्यामध्ये जे काही चालले आहे, ते राज्याच्या प्रतिमेला तडा देणारे आहे.निष्क्रियतेचीही सरकारने परिसीमा गाठली आहे. कोरोनाच्या उपाययोजनांवर एक रुपयाचाही खर्च राज्य सरकारने केला नाही. पीपीई किटपासून लसीकरणापर्यंतचा सर्व खर्च केंद्र सरकारने केला आहे. त्यामुळे राज्य सरकारला केंद्राकडे बोट करण्याचा कोणताही अधिकार नाही. या सरकारने शेतकरी, महिला, मजूर, कामगार, कर्मचारी यांच्यासाठी काय केले, हे जाहीर करावे. सरकारची सध्याची अवस्था ही ‘नाचता येईना, अंगण वाकडे’ अशी झाली आहे.

पवारांना माझ्याशिवाय करमत नाही शरद पवारांना माझ्याशिवाय करमत नाही. मी त्यांच्याविषयी काही बोललो नाही, तरी ते माझ्याविषयी काही तरी बोलत असतात. त्यांनी राज्यातील बदनाम मंत्र्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे. त्यांना आम्ही परिपक्व नेते म्हणतो. तरीही ते काही कारवाई करीत नाहीत, असेही पाटील म्हणाले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा