शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

दाक्षिणात्य अभिनेत्री खुशबू सुंदर भाजपमध्ये; काँग्रेसला सोडचिठ्ठी, मुस्कटदाबीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 23:50 IST

Khusabu Sundar Join BJP News: खुशबू सुंदरने काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे पाठविला.

चेन्नई : तामिळनाडूमध्ये गेल्या महिनाभरापासून जी शक्यता वर्तविण्यात येत होती ती सोमवारी खरी ठरून अभिनेत्री खुशबू सुंदर हिने काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. तामिळनाडू विधानसभेच्या आगामी निवडणुका पुढील वर्षी मे महिन्यात होणे अपेक्षित असले तरी भाजपसह सर्वच पक्षांनी आतापासून पूर्वतयारी सुरू केली आहे.

खुशबू सुंदरने काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे पाठविला. त्या पत्रात खुशबूने म्हटले आहे की, जनतेशी काडीचाही संपर्क नसलेल्या काही वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी माझी मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला.

असा आहे प्रवास...हिंदी, तामिळ व अन्य दाक्षिणात्य चित्रपटांत महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या अभिनेत्री खुशबू सुंदर हिने २०१० साली द्रमुक पक्षात प्रवेश केला. तेथील अंतर्गत राजकारणाला कंटाळून २०१४ साली तिने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मात्र, केंद्रातील सत्ता गेल्यानंतर त्या पक्षाला तामिळनाडूतही उतरती कळा लागली होती. काँग्रेस पक्षातही वाव नाही हे लक्षात आल्यावर खुशबूने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस