शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सोनिया गांधीच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष; कार्यकारिणीचे शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 02:31 IST

काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्याचे अधिकार बहाल

शीलेश शर्मानवी दिल्ली : तब्बल सात तासांच्या बैठकीनंतर काँग्रेस कार्यकारिणीने सोनिया गांधी याच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी असतील, यावर शिक्कामोर्तब केले. अखिल भारतीय काँग्रेसचे अधिवेशन बोलावून नवीन अध्यक्षांची निवड होईपर्यंत या पदावर राहून त्यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे, असा ठराव संमत करून कार्यकारिणीने त्यांना आवश्यक संघटनात्मक बदल करण्याचे अधिकार दिले. सूत्रांनुसार फेब्रुवारी-मार्च २०२१ च्या आधी काँग्रेसचे अधिवेशन होण्याची शक्यता नाही. यात राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपविण्याची तयारी केली जाईल.काँग्रेसच्या २३ नेत्यांनी लिहिलेल्या पत्राचा उल्लेख सोनिया गांधी यांनी बैठकीच्या समारोपाप्रसंगी केला. या पत्राने मी खूप दु:खी-कष्टी झाले; परंतु, काँग्रेस एक परिवार आहे, काँग्रेस परिवाराच्या एकजुटीसाठी काम करण्याचा मानस आहे. या परिवाराची एकजूट हीच खरी काँग्रेसची ताकद व मूळ भावना आहे, असे त्यांनी म्हटल्याचा दावा सूत्रांनी केला.बातम्यांमध्ये लोकमतची आघाडीकाँग्रेस नेत्यांचे नाराजीपत्र, त्यामुळे पक्षात सुरू झालेले वाद आणि सोनिया गांधी यांनी राजीनामा देण्याची केलेली तयारी या सविस्तर बातम्या ‘लोकमत’नेच सर्वांत आधी दिल्या होत्या.

लवकरच समिती देणार अभिप्रायपक्षाच्या उच्चपदस्थ सूत्रांनुसार, सोनिया गांधी लवकरच चार किंवा पाच सदस्यांची एक समिती स्थापन करणार आहेत. ही समिती पक्षाचे दैनंदिन कामकाज, संघटनात्मक फेरबदल, सदस्य अभियान आणि महाअधिवेशनासंबंधी नेतृत्वाला आपला अभिप्राय देईल. कार्यकारिणीने सर्वसंमतीने सोनिया गांधी यांना पक्ष संघटनेत आवश्यक ते बदल करण्याचे अधिकारही प्रदान केले आहेत. सूत्रांनुसार, पक्षात लवकरच काही उपाध्यक्षांची नियुक्ती आणि सरचिटणीस स्तरावर फेरबदल होण्याची शक्यता आहे.पक्षांतर्गत मुद्द्यांची सार्वजनिक चर्चा नकोबैठकीत केलेल्या आणखी एका ठरावात पक्षांतर्गत मुद्द्यांवर मीडियाच्या माध्यमातून किंवा सार्वजनिक व्यासपीठावर मते व्यक्त न करता पक्षपातळीवरच मते मांडण्याचा सल्ला नेत्यांना देण्यात आला आहे.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी