शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

...तर आम्हालाही मराठा तरुणांसोबत उपोषणाला बसावं लागेल, प्रवीण दरेकरांचा राज्य सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 16:04 IST

Praveen Darekar : मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी मराठा तरुणांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलकांची प्रवीण दरेकर यांनी आज भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली.

ठळक मुद्देशशिकांत शिंदे यांना 100 कोटींचीही किंमत नाही. आमच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला. त्यामुळे त्यांना तिथे किंमत नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपाने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत लवकर तोडगा काढला नाही, तर मराठा तरुणांबरोबर आम्हालाही उपोषणाला बसावे लागेल, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला दिला. 

मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी मराठा तरुणांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलकांची प्रवीण दरेकर यांनी आज भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला जी मदत लागेल, ती द्यायला आम्ही तयार आहोत. पण तोपर्यंत सरकारने एक अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. सरकार जर अध्यादेशाचा निर्णय घेणार नसेल तर आम्हालाही मराठा तरुणांसोबत उपोषणाला बसावे लागेल, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.

याचबरोबर, मराठा समजाचा आक्रोश थांबला असेल. त्यांची ताकद संपली असेल, असे राज्य सरकारला वाटत असेल, त्यामुळेच या आंदोलनाचा आवाज सरकारच्या कानावर जात नाही. या आंदोलनाची दखल घेण्यासाठी सरकारचा एकही प्रतिनिधी आलेला नाही. हे गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. मराठा समाजासोबत फक्त खेळवा-खेळवीचे राजकारण हे सरकार करत आहे, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला. 

शशिकांत शिंदेंना 100 कोटींचीही किंमत नाहीराष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी भाजपाचे नेते आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी 100 कोटींची ऑफर दिली होती, असा गौप्यस्पोट केला होता. या गौप्यस्फोटावरून प्रवीन दरेकर यांनी शशिकांत शिंदेंवर टीका केली. शशिकांत शिंदे यांना 100 कोटींचीही किंमत नाही. आमच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला. त्यामुळे त्यांना तिथे किंमत नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

टॅग्स :Praveen Darekarप्रवीण दरेकरPoliticsराजकारणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण