शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

गणेश नाईक यांची एसआयटी चौकशी करा, सुप्रिया सुळे यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 06:25 IST

SIT inquiry of Ganesh Naik, demand of Supriya Sule : महाराष्ट्रातील एखाद्या आमदाराचे संबंध अशा लोकांशी असतील आणि त्याची जाहीर कबुली ते भरसभेत देत असतील, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांची तातडीने चौकशी लावावी, अशी मागणी सुप्रिया सुळे केली.

नवी मुंबई : गुंडांबाबत काही समस्या असल्यास कधीही फोन करा. मला इंटरनॅशनल डॉन ओळखतात, असे वक्तव्य करणारे भाजपचे नेते गणेश नाईक यांची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी येथे केली. वाशी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्‌घाटन त्यांच्या पार पडले. त्यानंतर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.महाराष्ट्रातील एखाद्या आमदाराचे संबंध अशा लोकांशी असतील आणि त्याची जाहीर कबुली ते भरसभेत देत असतील, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांची तातडीने चौकशी लावावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पारदर्शकपणे महाराष्ट्रातील जनतेला याचे उत्तर द्यावे. कारण नागरिकांची सुरक्षा ही माझी नैतिक जबाबदारी आहे, असे सुळे म्हणाल्या.आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना ओळखणाऱ्या या नेत्यामुळे देशातील आणि नवी मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या संसदीय अधिवेशनात हा विषय मांडणार असून नाईक यांच्या चौकशीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.साधारण पंधरवड्यापूर्वी एका सभेत नाईक यांनी या आशयाचे वक्तव्य केले होते. या ठिकाणचे जे नेते ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचा मी प्रिन्सिपल असल्याचे नाईक म्हणाले होते. नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या जागावाटपाचे निर्णय राज्य पातळीवरील घेतले जातील. कार्यकर्त्यांनी मतभेद न ठेवता एकत्र काम करण्याचे आवाहन कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. तर नवी मुंबईतील सर्व कार्यकर्ते एकत्र केल्याचे माजी मंत्री शशिकांत शिंदे म्हणाले. शरद पवार यांनी राज्यात जो इतिहास घडविला, तोच इतिहास नवी मुंबई शहरात घडवायचा आहे. तीन पक्षांची ताकद एकत्र आली तर महापालिकेवर आघाडीचा झेंडा फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी खासदार आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, युवक अध्यक्ष राजेश भोर, माजी नगरसेविका सपना गावडे, संगीता बोऱ्हाडे, माजी नगरसेवक संदीप सुतार, वैभव गायकवाड आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

नवी मुंबईत सत्ता परिवर्तन होणार  जे पक्ष सोडून गेले आहेत त्यांनी तिकडेच रहावे. परत माती कराय़ला येऊ नका, असा टोला सुळे यांनी लगावला. महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करायला हवे. जोरदार तयारी करून नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जा. यावेळी नवी मुंबईत सत्तापरिवर्तन होणार, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेGanesh Naikगणेश नाईक