शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Pratap Sarnaik News: प्रताप सरनाईक बेपत्ता? ईडी, सीबीआयची लोणावळ्यातील रिसॉर्टवर धाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 13:02 IST

ED, CBI Raid in Lonavla, Pratap Sarnaik search :मी स्वतः ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे, नुसता फोन केलात तरी शंभर वेळा हजर होईन, असे प्रताप सरनाईकांनी ईडीला ठणकावून सांगितल्याचे म्हटले होते.

Pratap Sarnaik: मुंबई : बेहिशेबी मालमत्तांप्रकरणी गेल्या काही महिन्यांपूर्वी ईडीच्या आणि सीबीआयच्या चौकशीला सामोरे जाणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik ) यांच्या शोधासाठी ईडी (ED) व सीबीआयने (CBI) लोणावळ्यामध्ये धाडी टाकल्या आहेत. (ED, CBI Serching Shivsena Mla Pratap Sarnaik in Lonavla; Raid on resort.)

ईडीची काडी कोणी व कशासाठी केली, हे जनतेला कळून चुकलेले आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात परखड भूमिका मांडली आहे.  मी असल्या चौकशांनी घाबरून महाराष्ट्र हिताची जबाबदारी बाजूला ठेवणार नाही. मी लढणारा आहे आणि लढत राहणार. मी स्वतः ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे, नुसता फोन केलात तरी शंभर वेळा हजर होईन. पण मुलांचा काही संबंध नसताना त्यांना कशाला बोलावता असे, आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये म्हटले होते. 

आता ईडी आणि सीबीआय प्रताप सरनाईकांचा शोध घेत आहे. प्रताप सरनाईक बेपत्ता झाल्याचे बोलले जात आहे. ईडीने आणि सीबीआयने लोणावळा येथील एका रिसॉर्टवर धाड टाकली आहे. काहीवेळापूर्वीच दोन्ही तपास यंत्रणांचे अधिकारी या रिसॉर्टवर पोहोचले आहेत. 

भाजपा नेते किरिट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक गायब असल्याचा आरोप केला आहे. ईडीने सरनाईकांना ताब्यात घेण्यासाठी शोध सुरु केला आहे. याआधी गेल्या वर्षी ईडीने प्रताप सरनाईकांच्या मुलाला ताब्यात घेतले होते. 

किरिट सोमय्यांचे आरोप....

प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डन या इमारतीला पालिकेचा परवाना नाही. ही इमारत अनधिकृत आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच ठाण्यातील रेमंड कंपनीसमोर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी 13 मजल्याचे दोन टॉवर बांधले आहेत. OC न घेताच सर्व फ्लॅटची विक्री केली असा आरोप सोमय्या यांनी केला. 2008 साली ठामपा ने सदर बांधकामाला अनधिकृत ठरवले व तोडक कारवाईचे आदेश दिले परंतु आजतागायत त्यावर कोणतीच कारवाई न झाल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त जात असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. प्रताप सरनाईक यांनी सामान्य नागरिकांची फसवणूक केली असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील किरीट सोमय्या यांनी केली यापूर्वी केली होती. 

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCBIगुन्हा अन्वेषण विभागShiv Senaशिवसेना