शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

“तुझ्या मायनं दूध पाजलं असेल तर...”; शिवसेना आमदार संजय गायकवाडांची भाजपा आमदाराला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 10:04 IST

Shivsena Sanjay Gaikwad: देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेनंतर पुन्हा एकदा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली आहे.

ठळक मुद्देमी फक्त यावर वस्तूस्थिती मांडली तर माझा पुतळा जाळण्यात आला. पण माझा यात दोष काय?राज्यातील जनतेला मरणाच्या दारात सोडत असाल तर मी जी भावना मांडली ती चुकीची आहे का? राज्यातील लोक मरू लागले आणि तुम्ही आंदोलन करताय. लोक मरत आहेत त्याला जबाबदार तुम्ही आहात

बुलढाणा – शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजपा नेत्यांमधला कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. यातच शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे. भाजपाचे संजय कुटेसारखा तीनपाट आमदार दिवसभर दारू पिऊन वावरात पडलेला असतो. माझा पुतळा काय जाळतो, हिंमत असेल तर माझ्यासमोर येऊन दाखव. मग मी काय आहे ते दाखवतो अशी धमकी आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.

संजय गायकवाड यांनी व्हिडीओ काढून म्हटलंय की, राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि काँग्रेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडीचं सरकार आहे म्हणून केंद्राकडून रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. मी फक्त यावर वस्तूस्थिती मांडली तर माझा पुतळा जाळण्यात आला. पण माझा यात दोष काय? देशातील सर्व लोक एकाच पक्षाचे आहेत का? राज्यात मुख्यमंत्री आपला नाही म्हणून अडवणूक करता. राज्यातील जनतेला मरणाच्या दारात सोडत असाल तर मी जी भावना मांडली ती चुकीची आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

तसेच संजय कुटेसारखे आमदार दारू पिऊन वावरात पडलेले असतात. त्याला सर्व शौक आहे तो मवाली आहे. तुझ्या मायनं दूध पाजलं असेल तर ५० मीटर माझ्या जवळ येऊन दाखव तुला संजय गायकवाड काय आहे ते दाखवतो अशी धमकी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे. माझ्याविरोधात तक्रार काय देता? मीच तुमच्याविरोधात तक्रार करतो. राज्यातील लोक मरू लागले आणि तुम्ही आंदोलन करताय. लोक मरत आहेत त्याला जबाबदार तुम्ही आहात असा आरोपही संजय गायकवाड यांनी केला आहे.  

देवेंद्र फडणवीसांवर केली होती टीका

 'तुमच्या सरकारमुळे लाखो लोक मरतील त्याचं काय? ज्याचा घरातला माणूस मरतो, ज्याच्या घरात जीव जातो, त्याला समजतं की कोरोना काय आहे? मला कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबून टाकले असते असं विधान संजय गायकवाड यांनी केले होते.

देवेंद्र फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर

’संजय गायकवाड यांची रात्रीची उतरली नसताना पत्रकार परिषद घेतली असावी. मात्र मी त्यांना विनंती करतो की, माझ्या घशात कोरोनाचे किटाणू घालण्याआधी त्यांनी हँड ग्लोज घालावेत आणि चेहऱ्यावर नीट मास्क लावावा. कारण काय आहे की, मला जनतेचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे मला काही होणार नाही. मात्र माझ्या माहितीप्रमाणे सामान्य माणसापेक्षा तळीरामांना कोरोना लवकर होतो असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाSanjay Gaikwadसंजय गायकवाड