शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

“तू आमदारकीचा राजीनामा दे अन् निवडणूक लढ, शिवसैनिक तुझे थोबाड फोडतील”; शिवसेनेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2021 11:27 AM

Prasad lad Controversy Statment: शिवसेनेच्या मतांवर तू आमदार झालाय. हिंमत असेल तर राजीनामा दे आणि निवडणूक लढ असा इशारा शिवसेना नेत्याने दिला आहे.

ठळक मुद्देएवढी भीती यांना वाटू लागलीय की माहिममध्ये आपण आता आलोय म्हणजे सेना भवन फोडणार की काय असं यांना वाटतं.काही घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू, भाजपा आमदार प्रसाद लाड यांचे विधानवंदनीय बाळासाहेबांचं शिवसेना भवन हे महाराष्ट्रासाठी भूषण - मंत्री उदय सामंत

मुंबई – भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. वेळ आली तर शिवसेना भवन फोडू असं लाड यांनी म्हटल्याने शिवसेनेचे नेते संतापले आहेत. आमदार प्रसाद लाड यांच्यावर चहुबाजूने टीका होत असून तू आमदारकीचा राजीनामा दे आणि निवडणूक लढव असा टोला शिवसेना नेते राजन साळवी यांनी लाड यांना लगावला आहे.

शिवसेना(Shivsena) नेते राजन साळवी म्हणाले की, शिवसेनेच्या मतांवर तू आमदार झालाय. हिंमत असेल तर राजीनामा दे आणि निवडणूक लढ. मग बघ शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील आणि तुला गाडतील. पहिल्यांदा आमदारकीचा राजीनामा दे असं त्यांनी इशारा दिला आहे. तर शिवसेना भवन फोडू म्हणणाऱ्या भाजपच्या काही पुढाऱ्यांच्या राजकीय विचारांच्या दिवाळखोरीच उत्तर महाराष्ट्रातील जनता नक्की निवडणुकीत भाजपला भुईसपाट करून देईल. वंदनीय बाळासाहेबांचं शिवसेना भवन हे महाराष्ट्रासाठी भूषण आहे असं मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते प्रसाद लाड?

"नारायण राणेंना स्वाभीमानचा खूप मोठा गट आज राणेंमुळे भारतीय जनता पक्षात आला आहे. त्यामुळे भाजपाची ताकद निश्चितपणे दुप्पट झाली आहे. पुढच्या वेळी आपण जरा कार्यकर्ते कमीच आणू, कारण आपण आलो की पोलिसच खूप येतात. फक्त त्यांना सांगूयात गणवेशात येऊ नका, म्हणजे आपल्या हॉलमध्ये बसायला त्यांचा उपयोग होईल. एवढी भीती यांना वाटू लागलीय की माहिममध्ये आपण आता आलोय म्हणजे सेना भवन फोडणार की काय असं यांना वाटतं. काही घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू" असं चिथावणीखोर वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं होतं.

संजय राऊतांनी उडवली खिल्ली

महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही.( समझनेवालोंको इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार? अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊतांनी प्रसाद लाड यांची खिल्ली उडवली आहे.

शिवसेनेचे बालेकिल्ले पाडून दाखवू

महाराष्ट्रात किल्ले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. बाकी शिवसेनेचे बालेकिल्ले आम्ही पाडून टाकू, असंही प्रसाद लाड म्हणाले. भाजपानं इतकी वर्ष शिवसेनेला ताकद देण्याचं काम केलं आणि त्यांची ताकद मोडून काढायचं काम करू, असा इशारा देखील लाड यांनी दिला होता.

टॅग्स :Prasad Ladप्रसाद लाडShiv Senaशिवसेना