शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या मिशीला हात लावायला सुद्धा हिंमत लागते, या मी वाट पाहातोय; संजय राऊतांचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 13:25 IST

Sanjay Raut: वाघ हा वाघ असतो. त्याच्या मिशिला हात लावायला सुद्धा हिंमत लागते, या मी वाट पाहातोय मग बघू, असं म्हणत शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

Sanjay Raut: वाघ हा वाघ असतो. त्याच्या मिशिला हात लावायला सुद्धा हिंमत लागते, या मी वाट पाहातोय मग बघू, असं म्हणत शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. 

पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. सरकार काम करत असतं पण पक्ष संघटनेला गती मिळावी यासाठीही कार्यकर्ता स्तरावर काम करावं लागतं. कोरोना असला तरी राजकारण थांबत नाही. सत्ता मागच्या पानावरुन पुढे नेत असताना तुम्हाला संघटना बळकट करणं आणि संघटनेच्या तळागळातील कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी दौरे करावे लागतात. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसारच शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी मी दौरा करतोय, असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. 

चंद्रकांत पाटील यांना दिलं जोरदार प्रत्युत्तरभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका करताना आमची दोस्ती वाघाशी होती. पिंजऱ्यातील वाघाशी नाही, असं विधान केलं होतं. त्यावर प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांचं मन लहानमुलासारखं आहे. ते निष्पाप, निष्कलंक आणि निष्कपट नेते आहेत. वाघाच्या मिशीला हात लावायलाही हिंमत लागते. या मी वाट पाहातोय, असं म्हटलं आहे. 

५ वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री ही 'कमिटमेंट' राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या वाटाघाटी संदर्भातील वावड्यांबाबत बोलताना संजय राऊत यांनी राज्यात शिवसेनेचाच ५ वर्ष मुख्यमंत्री राहिल. त्यात ना कोणता वाटा किंवा घाटा होणार नाही. तशी कमिटमेंटच सुरूवातीला दिली गेली आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाchandrakant patilचंद्रकांत पाटीलNashikनाशिक