शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीतील सहकारी पक्षांवर शिवसेनेचा बाण, शरद पवार - अमित शहा भेटीच्या चर्चेनंतर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 06:46 IST

Shiv Sena criticize NCP : शिवेसेनेचे मुखपत्र ‘सामना’त रविवारच्या लेखात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. यातून असे संकेत मिळत आहेत की, राज्यातील सत्ताधारी पक्षांमधील संबंध ताणले गेले आहेत.

मुंबई : शिवेसेनेचे मुखपत्र ‘सामना’त रविवारच्या लेखात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. यातून असे संकेत मिळत आहेत की, राज्यातील सत्ताधारी पक्षांमधील संबंध ताणले गेले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपानंतर शिवसेनेची अशी इच्छा होती की, देशमुख यांना या पदावरून दूर करावे. मात्र, शरद पवार यांनी त्यांना हटविण्याविरुद्ध भूमिका घेतली. त्यानंतर शिवसेनेनेही आपल्या भूमिकेत बदल केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी हा लेख प्रकाशित झाला आहे, हे विशेष. अमित शहा यांनी या भेटीबाबत दुजोरा दिला नाही. मात्र, राजकारणात सर्व गोष्टी उघड करायच्या नसतात, असे विधान केले आहे. राष्ट्रवादीने अशा बैठकीचा इन्कार केला आहे. ‘महाराष्ट्राच्या चारित्र्यावर प्रश्न, डॅमेज कंट्रोलचा फज्जा’, या लेखात म्हटले आहे की, गृहमंत्रीपदासाठी आवश्यक कुशाग्रतेबाबत देशमुख विसरले आहेत. या लेखात म्हटले आहे की, देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले आहे. जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. सचिन वाझे यांच्यासारखा ज्युनिअर ऑफिसर जर पैसे गोळा करण्याचे रॅकेट चालवीत होता, तर गृहमंत्र्यांना याची माहिती का नव्हती. अजित पवार यांनी संपादकीय लेखावर भाष्य करताना म्हटले आहे की, कुणीही आघाडी सरकारमधील वातावरण बिघडवू नये. कॅबिनेटचे पद कुणाला द्यायचे हा आघाडीतील ज्या- त्या राजकीय पक्षाचा विशेषाधिकार आहे. तीनही पक्ष व्यवस्थित काम करत आहेत.  

वातावरण ढवळून निघालेnमुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ सापडलेल्या स्फोटके प्रकरणानंतर या पक्षांमधील दुही समोर आली. nमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊत