शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष होणार? संजय राऊतांनी सांगितलं कोण ठरवणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 11:28 IST

Sanjay Raut on Assembly Speaker election: महाविकास आघाडीत सुसंवाद आहे. सत्तेतील व्य़क्तींची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसच्या वाट्याला गेले आहे. त्यामुळे पुढचा अध्यक्ष त्यांचाच असेल, असे संजय राऊत म्हणाले.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्रावर उपकार होतील. ही जागा काँग्रेसचीच होती, त्यांचाच अध्यक्ष होणार, असे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. तसेच त्यांचा कोण उमेदवार असेल हे सोनिया गांधी (Sonia Gandhi) ठरवतील, असेही त्यांनी सांगितले. (Sanjay Raut clear about Speaker of the Assembly election candidate row.)

महाविकास आघाडीत सुसंवाद आहे. सत्तेतील व्य़क्तींची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसच्या वाट्याला गेले आहे. त्यामुळे पुढचा अध्यक्ष त्यांचाच असेल. महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होईल. विरोधकांनी ही निवडणूक नाही लढविली तर महाराष्ट्रावर उपकार होतील, असे त्यांनी म्हटले. मराठा समाजाविषयी आस्था असेल तर पंतप्रधान लक्ष घालतील. आता केंद्र सरकारनेच यातून मार्ग काढावा, असे राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस शहांना जाऊन भेटले, त्यात चर्चा करण्यासारखे काय. मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह भेटले होते. त्यावेळीही वेगळी चर्चा रंगली होती, असे राऊत म्हणाले. 

विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असावा हा काँग्रेसचा प्रश्न आहे. यावर मुख्यमंत्री, राष्ट्रवादी आणि सोनिया गांधी यांच्यात चर्चा झाली असेल, असे राऊत यांनी म्हटले. पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्ष करण्याची शिवसेनेची मागणी असल्यावर त्यांनी काँग्रेसचा उमेदवार शिवसेना ठरवत नाही, शिवसेनेचा असेल तर उद्धव ठाकरे ठरवतील. सोनिया गांधींशी ठाकरेंचे चांगले संबंध आहेत. कोणता प्रसंग उभा ठाकल्यास ते एकमेकांशी चर्चा करतात, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणvidhan sabhaविधानसभाcongressकाँग्रेस