शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

अंकुश राणेंची हत्या कोणी केली?; शिवसेना खासदार विनायक राऊतांनी 'राणे कुंडली' काढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 15:38 IST

शिवसेनेचं भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंना प्रत्युत्तर

नवी दिल्ली: शिवसेनेमध्ये ३९ वर्षे काम केल्यानं अनेक जुनी प्रकरणं माहीत आहेत. हळूहळू टप्प्याटप्प्यानं प्रकरणं बाहेर काढू, असा गर्भित इशारा देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंना शिवसेनेनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणे आणि त्यांच्या पुत्रांच्या जुन्या प्रकरणांची यादी वाचून दाखवत 'राणे कुंडली'चा उल्लेख केला. ही कुंडली विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनीच वाचून दाखवली होती, हे सांगायलादेखील राऊत विसरले नाहीत.

एका दरोडेखोराला ज्याप्रकारे अटक होते, त्याप्रमाणे मला अटक करण्यात आली. दोनशे-तीनशे पोलीस बोलावण्यात आले, असं नारायण राणे आज जनआशीर्वाद यात्रेत म्हणाले. एका केंद्रीय मंत्र्याला अटक करून काय पराक्रम केला, असा सवाल त्यांनी सरकारला विचारला. त्यावर बोलताना ही वेळ राणेंवर का आली, याचा अभ्यास केल्यास बरं होईल, असा टोला खासदार विनायक राऊतांनी लगावला. राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायाधीशांनी केलेली विधानं महत्त्वाची आहेत. अपराध केला असेल तर पोलीस पकडणारच, असंदेखील राऊत पुढे म्हणाले.

आज जनआशीर्वाद यात्रेत बोलताना नारायण राणेंनी अनेक जुन्या प्रकरणांचा उल्लेख केला. त्यालाही राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. 'अंकुश राणे या सख्ख्या चुलत भावाची हत्या कोणी केली? त्यांना कोणत्या गाडीतून नेण्यात आलं? कुठे जाळण्यात आलं? नारायण राणेंच्या मुलानं चिंटू शेखवर गोळीबार केला. त्याची विचारपूस कधी राणेंनी केली का?', असे प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी विधानसभेत राणे कुंडलीचा उल्लेख केला होता. त्यावेळी राणे काँग्रेसमध्ये होते. राणेंवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती फडणवीस यांनी सभागृहाला दिली होती. फडणवीसांनी मांडलेल्या त्या राणे कुंडलीचा अभ्यास राज्य सरकारनं जरूर करायला हवा, असं सूचक विधान राऊत यांनी केलं.जनआशीर्वाद यात्रेदरम्यान राणेंचा शिवसेनेवर निशाणाशिवसेनेसोबत मी ३९ वर्षे काम केलंय. त्यामुळे अनेक जुनी प्रकरणं मला माहीत आहेत. रमेश मोरेंची हत्या कशी झाली. आपल्याच आपल्याच बंधूच्या पत्नीवर म्हणजेच वहिनीवर ऍसिड फेकायला कोणी सांगितलं, या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत. सगळी प्रकरणं टप्प्याटप्प्यानं बाहेर काढू, अशा शब्दांत राणेंनी शिवसेनेला इशारा दिला. अनेक जुनी प्रकरणं आहेत. दिशा सालियन, सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूची चौकशीदेखील अद्याप पूर्ण झालेली नाही, असं राणे म्हणाले.

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Narayan Raneनारायण राणेShiv Senaशिवसेना