शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"रावसाहेब दानवेंची जीभ कापणाऱ्याला दहा लाखांचे बक्षीस"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 16:55 IST

santosh dhavale : दानवेंची जीभ कापण्यासाठी आपण केवळ कुणावर अवलंबून राहणार नसून स्वत:ही योग्य संधीची प्रतीक्षा करू आणि हे काम फत्ते करू, असेही ढवळे यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देया आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड यांच्यासह विविध पदाधिकारी सहभागी झाले होते.

यवतमाळ : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान-चीनचा हात असल्याचे बेताल वक्तव्य करणारे भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची जीभ कापणाऱ्या व्यक्तीला दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस देऊ, अशी घोषणा यवतमाळातील शिवसेनेच्या आंदोलनात विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी केली. पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि दानवेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी येथील दत्त चौकात शिवसैनिक एकत्र आले. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. 

या आंदोलनाबाबत यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी 'लोकमत'ला सांगितले की, आंदोलनाच्या दहा मिनिटपूर्वी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आलेला एक इसम भेटला. आपल्याला रक्ताची गरज आहे, रक्त मिळत नाही, भाजपावाल्यांकडे गेलो तर ते शिव्या देतात, तुम्ही लोक आंदोलन करत नाही, मस्त गाड्यांमध्ये फिरता, अशा शब्दात त्यांनी सुनावले. त्यांच्या वक्तव्याने आपण क्षणात एक निर्णय घेतला. आपल्याला शेतकऱ्यांच्या मुलांनी लोकवर्गणी करून चारचाकी वाहन पक्ष कार्यासाठी व समाजसेवेसाठी उपलब्ध करून दिले आहे. 

शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रावसाहेब दानवे यांची जीभ जो कोणी कापेल, त्याला आपण लगेच हे १२ लाखांचे वाहन भेट देऊ, त्या क्षणापासून आपण पायी फिरू, वाहन वापरणार नाही, एवढेच नव्हे तर त्याला आणखी दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. शिवाय, त्याची रक्ततुलाही केली जाईल, अशी घोषणा आपण लगेच शिवसेनेच्या दत्त चौकातील आंदोलनात केल्याचे संतोष ढवळे यांनी सांगितले. 

या घोषणेचे उपस्थितांनी जोरदार स्वागत केले. दानवेंची जीभ कापण्यासाठी आपण केवळ कुणावर अवलंबून राहणार नसून स्वत:ही योग्य संधीची प्रतीक्षा करू आणि हे काम फत्ते करू, असेही ढवळे यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड यांच्यासह विविध पदाधिकारी सहभागी झाले होते.

भाजपाचेही निषेध आंदोलनदरम्यान, सेनेच्या आंदोलनाच्या काही वेळ पूर्वी भाजपानेही याच दत्त चौकात आंदोलन केले. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा निषेध नोंदविला.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेYavatmalयवतमाळBJPभाजपाFarmer strikeशेतकरी संपShiv Senaशिवसेना