शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेन दिल्यामुळेच जपानच्या माजी पंतप्रधानांना पद्म पुरस्कार; संजय राऊतांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 13:24 IST

केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. पुरस्काराच्या यादीवरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. पुरस्काराच्या यादीवरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

"ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाले ते काबिल असतील. त्यांचं मी स्वागत करतो. बुलेट ट्रेन दिल्यामुळेच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्म पुरस्कार देण्यात आला असावा", असं संजय राऊत म्हणाले. राज्य सरकारने पद्म पुरस्कारांसाठी केंद्राकडे एकूण ९८ नावांची शिफारस केली होती. यामधून सहा जणांची पद्म पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यावरुनही संजय राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला. 

"महाराष्ट्र राज्य इतकं मोठं आहे. त्यात इतके लोक काम करतात. पण महाराष्ट्रातील केवळ ६ जणांनाच पुरस्कार देण्यात आला आहे. राज्यातील १० ते १२ जणांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा फक्त सहाच जणांना पुरस्कार देता? ही नावं पाहून मला आश्चर्य वाटलं", असं संजय राऊत म्हणाले. 

केंद्र सरकारने देशातील ११९ कर्तृत्ववान व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर केला आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रातील 6 जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून राज्य सरकारने शिफारस केलेल्या सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राज्य सरकारने शिफारस केलेल्या नावांच्या यादीत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचंही नाव होतं. संजय राऊत यांनाही पद्म पुरस्कारने सन्मानित करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली होती. मात्र, केंद्राने केवळ एकाच नावाला पंसती दिली असून इतर ९७ व्यक्तींना यंदा तरी पद्म पुरस्कारासाठी नाकारले आहे.

महाराष्टाच्या यादीत कुणाकुणाचा होता समावेशमहाराष्ट्राने केंद्राला पाठवलेल्या ९८ जणांच्या यादीत शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी, लिटिल मास्टर सुनील गावसकर, एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख यांसारख्या दिग्गजांचा समावेश होता.  सिंधुताई सपकाळ, ‘सिरम’चे अदर पूनावाला, प्रोफेशनल स्कायडायव्हर शीतल महाजन, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेते मोहन आगाशे, कै. राजारामबापू पाटील व डॉ. मिलिंद कीर्तने यांची नावे पद्मभूषणसाठी गेल्या सप्टेंबरमध्येच केंद्राकडे पाठविण्यात आली होती.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाpadma shri awardsपद्मश्री पुरस्कारShinzo Abeशिन्जो आबे