शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेत घुसमट? वेगळा मार्ग शोधणार?; नारायण राणेंच्या विधानावर एकनाथ शिंदे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 13:09 IST

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विधानावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

मुंबई: राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेमध्ये घुसमट सुरू आहे. ते केवळ सहीपुरतेच उरले आहेत. नगरविकास खात्याचा कारभार मातोश्रीवरूनच चालतो. यामुळे शिंदे हे वेगळा मार्ग शोधण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी भाजपमध्ये यावे, असं आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल केलं. राणेंच्या या दाव्याला आता खुद्द एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मला कामाचं स्वातंत्र्य नाही. माझ्या विभागाचा कारभार मातोश्रीवरून चालतो, हा शोध नारायण राणेंनी कुठून लावला ते माहीत नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 'मला माझ्या विभागात काम करताना पूर्ण स्वातंत्र्य आहे. अनेक प्रलंबित प्रश्न मी मंत्री म्हणून मार्गी लावले आहेत. बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्गाचं काम आम्ही पुढे नेत आहोत,' असंही शिंदे पुढे म्हणाले. मी पक्षात समाधानी आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या दाव्यात, त्यांच्या विधानात कोणतंही तथ्य नाही. त्यांचं वक्तव्य चुकीचं आहे. मातोश्रीकडून माझ्या कामात कोणताही हस्तक्षेप होत नाही. मला स्वातंत्र्य नसतं, तर मी अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊ शकलोच नसतो, असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं. 

नारायण राणेंचा शिवसेना, ठाकरे सरकारवर हल्लाबोलकेंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू असून शनिवारी त्यांनी वसई- विरार शहराचा दौरा केला. गोमूत्र शिंपडण्याचे उद्योग करण्यापेक्षा रोजगार देण्याचे व्यवसाय करा, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर घणाघाती हल्ला केला. भरपावसात काढलेल्या या यात्रेला मोठी गर्दी जमली होती. यात्रेदरम्यान त्यांनी वसईतील उद्योजकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. जेवढी कामे मी केली आहेत, त्यापेक्षा एक दशांश कामेही उद्धव ठाकरे यांनी केलेली नसल्याचं ते म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेNarayan Raneनारायण राणे BJPभाजपाShiv Senaशिवसेना